गुगल मॅपच्या नादी लागू नका… नकाशाच्या दिशेने चाललेली कार खाडीत कोसळली
कोणत्याही अनोळख्या ठिकाणी जायचे असेल तर कारचालक मोबाईलवर गुगल मॅप उघडतात आणि इच्छित स्थळाच्या दिशेने सुसाट सुटतात.. पण या गुगल मॅपच्या नादी फार लागू नका, कारण गुगल मॅपच्या दिशेने निघालेली भरधाव कार थेट बेलापूरच्या खाडीत कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने घटनास्थळी तैनात असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी धाव घेत खाडीत वाहून चाललेल्या या कारचालक महिलेचे प्राण वाचवले आणि ती कार क्रेनच्या सहाय्याने खाडीतून बाहेर काढली.
मुंबईहून उलव्याच्या दिशेने एक महिला तिच्या ऑडी कारने उलवेच्या दिशेने निघाली होती. मात्र बेलापूर येथील खाडीपुलावर जाण्याऐवजी तिने पुलाखालचा मार्ग निवडला. गुगल मॅपवर तेथे सरळ रस्ता असल्याचे दाखवले. मात्र तिची भरधाव कार थेट ध्रुवतारा जेट्टीवरील खाडीत कोसळली. ही घटना तेथे तैनात असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांनी पाहिली. यावेळी ड्युटीवर हजर असणारे पोलीस उपनिरीक्षक म्हात्रे, जुमळे, जावळे आणि नौका विभागाचे ए.एस.आय. जायकर, ए.एस.आय. रवींद्र राऊत, पोलीस हवालदार यशवंत भोसले यांनी खाडीत झोकून देत वाहन चाललेल्या कारचालक महिलेचे प्राण वाचवले व तिला सुखरूप खाडीबाहेर काढले.
इंडियन रेस्क्यू फोर्सचे जवान संस्कार तास्ती, अमित, शुभम पाटील, प्रज्योत सानप, सूरज चव्हाण यांच्या पथकानेही मोलाची भूमिका बजावली. खाडीत कोसळलेली एम.एच.०४-जी.ई. ८६३६ ही ऑडी कार खासगी केनला पाचारण करत खाडीतून बाहेर काढण्यात पोलिसांना
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List