अमित शहांना पंतप्रधान व्हायचंय पण मोदी होऊ देणार नाहीत, संजय राऊत यांचा मोठा दावा
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर दिल्लीतील राजकारणात खळबळ उडाली. दरम्यान सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी हे 75 वर्षांचे होणार आहेत, त्यामुळे ते राजीनामा देणार का? दिला तर त्यांची जागा कोण घेणार अशा अनेक विषयांवर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी एक मोठा दावा केला आहे. ”गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधानपदाची महत्त्वकांक्षा आहे, त्या दृष्टीने त्यांची पाऊले पडत आहेत. मात्र नरेंद्र मोदी कधीच त्यांना पंतप्रधान होऊ देणार नाहीत’, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
”अमित शहा यांना पंतप्रधानपदाची महत्त्वकांक्षा आहे. त्यांना दिल्लीतल्या सर्वोच्च पदी येण्याची महत्त्वकांक्षा आहे. त्या दृष्टीने त्यांची पाऊलं पडतायत. पण नरेंद्र मोदी ते होऊ देणार नाहीत. नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये 75 वर्षांचे होतायत. पण कोणत्याही परिस्थितीत ते शहांना आपल्या पदावर येऊ देणार नाही. ते शहांना पुन्हा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून परतच पाठवतील”, असे संजय राऊत म्हणाले.
”सगळे नरेंद्र मोदींना रिटार्ड करू इच्छित आहेत. त्यात अमित शहा देखील आहेत. अमित शहांना वाटतं मोदींनंतर मी, राजनाथ सिंह यांना वाटतं की मोदीनंतर मी. या मी मी च्या राजकारणात देशाचं नुकसान करत आहेत”, असेही संजय राऊत म्हणालेय
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List