धामणी, कवडास, वांद्री प्रकल्पांचे दरवाजे उघडले, तीन धरणे ओव्हरफ्लो; पालघरची पाणी चिंता मिटली

धामणी, कवडास, वांद्री प्रकल्पांचे दरवाजे उघडले, तीन धरणे ओव्हरफ्लो; पालघरची पाणी चिंता मिटली

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जून, जुलैमध्ये 14 टक्के जास्त पाऊस झाला आहे. या घो धो कोसळलेल्या पावसाने पालघर जिल्ह्यामधील धरणे ओव्हरफ्लो झाली असून धामणी, कवडास, वांद्री प्रकल्पांचे दरवाजे उघडले आहेत. याबरोबरच अन्य मोठे बंधारेदेखील ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नागरिकांची पाणी चिंता मिटली आहे. त्याचबरोबर शेतीच्या सिंचनलाही मुबलक पाणी मिळणार आहे. या महिन्यात 577. 8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पालघर जिल्ह्यात धामणी, कवडास, बांद्री ही प्रमुख धरणे असून मनोर, माहीम-केळवा, देवखोप, रायतळे, खांड आणि मोह खुर्द हे बंधारे आहेत. जिल्ह्यातील सूर्या धरण प्रकल्पातील धामणी आणि कवडास धरणातून डहाणू, बोईसर, पालघर, वसई-विरार महानगरपालिकांसह अदानी औष्णिक वीज प्रकल्प, तारापूर अणुऊर्जा प्रकल्प, तारापूर एमआयडीसी यासारख्या मोठ्या उद्योगांना पाणीपुरवठा केला जातो. सोबतच जिल्ह्यातील इतर लहान धरणांवर गावपाड्यातील पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत. रब्बी हंगामात सूर्या आणि वांद्री धरण प्रकल्पांतून डहाणू आणि पालघर तालुक्यातील पाच हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील शेतीला सिंचनाचे पाणी पुरविले जाते. धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने पाण्याची चिंता मिटली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धामणी धरणात पातळी वाढल्याने तीन वक्राकार दरवाजे उघडले. त्यामुळे हजारो लिटर पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरणातील पाण्याची पातळी 115.20 मीटर इतकी नोंदली गेली असून एकूण साठा 231.705 दल घमी (83.84%) एवढा आहे. सध्याच्या हवामान अंदाजानुसार पाण्याची पातळी 115.60 मीटरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. ही पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दरवाजे क्रमांक 1,3 आणि 5 प्रत्येकी 0.50 मीटरने उघडण्यात आले असून दररोज जवळपास 5 हजार क्युसेक पाणी सूर्या नदीत सोडले जात आहे.

नद्यांची पाणीपातळी वाढली

पालघर जिल्ह्यात सूर्या अर्थात मासवण नदी, वैतरणा, पिंजाळ, आणि देहरजा अशा नद्या असून सूर्या नदीची इशारा पातळी 11 मीटर इतकी आहे. सद्यस्थितीत 3.28 मीटर पातळी या नदीची आहे. वैतरणा नदीची इशारा पातळी 101.90 इतकी असून सध्या तिची पातळी 99.60 मीटर इतकी आहे. पिंजाळ नदी इशारा पातळी जवळ येऊन पोहोचली आहे. तिची इशारा पातळी 102.75 इतकी असून सध्या 101.60 मीटर अशी पातळी नदीची आहे. देहरजा नदी 98.75 मीटर इशारा पातळीवर असून आता 96.42 मीटर पातळी नदीची आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

केळीच्या सालीचा चहा प्यायलाय का? 5 मिनिटांत तयार, शरीराला मिळतील अगणित फायदे केळीच्या सालीचा चहा प्यायलाय का? 5 मिनिटांत तयार, शरीराला मिळतील अगणित फायदे
आपण सहसा केळी खाऊन साल फेकून देतो. आपल्याला वाटतं की, केळीची साल निरुपयोगी आहे, पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल...
डोळ्यांमध्ये ‘ही’ लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेटा आणि गंभीर आजारांचा धोका टाळा
Ratnagiri News – खुराड्यात कोंबड्या फस्त करायला गेला अन् अडकला, बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश
पुणे रेव्ह पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांची माहिती, अवघ्या दोन मिनिटात पत्रकार परिषद आटोपली
राधानगरीतील हरप नदीवरील लोखंडी साकव खचला; मानबेट, राई व चौके या गावांची वाहतूक बंद
महाराष्ट्र आज आनंदी आहे! उद्धव ठाकरे- राज ठाकरे भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रीया
राज यांच्या भेटीमुळे आनंद अनेक पटींनी वाढला आहे; उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना