चपलेची देखील असते एक्सपायरी डेट; चप्पल, बूट किती महिन्यांनी बदलावेत? ..तर पायाचं होईल मोठं नुकसान
प्रत्येक वस्तुची एक एक्सपायरी डेट असते, त्यानंतर ती वस्तू हळहळू खराब होऊ लागते. एसीपासून ते फ्रिजपर्यंत आणि टीव्हीपासून ते कूलरपर्यंत सर्व गोष्टींना एक विशिष्ट एक्सपायरी तारीख असते, मात्र तुम्ही पायामध्ये जे चप्पल बूट घालता त्याला देखील एक्सपायरी डेट असू शकते का? याबाबत तुम्ही कधी विचार केला आहे? अनेक लोक एकदा चप्पल किंवा बूट खरेदी केल्यानंतर तो फाटेपर्यंत किंवा तो पूर्णपणे खराब होईपर्यंत घालतात. चप्पल फाटली तर तिला शिवलं जातं आणि पुन्हा एकदा तिचा वापर होतो, मात्र असं करणं हे चूक आहे, चप्पल किंवा बुटाचा देखील एका विशिष्ट कालमर्यादेपर्यंतचं वापर केला पाहिजे, त्यानंतर नवे चप्पल किंवा बूट खरेदी करावेत, आज आपण जाणून घेणार आहोत, तुम्ही वापरत असलेले चप्पल किंवा बूट नक्की कधी बदलले पाहिजेत आणि ते जर वेळेत बदलले नाहीत तर काय नुकसान होऊ शकतं?
एक्सपर्ट्सनुसार जर तुम्ही तुमच्या चप्पल किंवा बूटाचा दररोज वापर करत असाल तर दर सहा किंवा आठ महिन्यांनंतर ते एकदा बदलले गेलेच पाहिजेत. तुम्ही चप्पल किंवा बूट कधी बदलावेत हे तुम्ही त्याचा किंती वापर करता यावर अवलंबून आहे. जर तुमच्या चप्पलच सोल घासलं गेलं असेल, ती फाटली असेल किंवा तिचा आकार बिघडला असेल तर समजून घ्या की आता चप्पल बदलण्याची वेळ आली आहे. जर तुमची चप्पल घासली असेल आणि तरीही तुम्ही तशीच चप्पल वापरत असाल तर त्याचा परिणाम हा तुमच्या शरीरावर होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या पायामध्ये त्रास जाणू शकतो. तुमच्या पायला वेदना होऊ शकतात, पायच नाही तर तुमची कंबर आणि मान देखील दुखू शकते.
जर तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून एकच एक चपलेचा जोड वापरत असाल तर त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचं नुकसान होऊ शकतं. ज्यामुळे तुमच्या टाचेला त्रास होऊ शकतो. पाय दुखू शकतात. कंबर आणि मानेला देखील तीव्र वेदना होऊ शकतात. त्यामुळे अशा स्थितीमध्ये तुम्ही जर दररोज त्याच चपलेचा वापर करत असाल तर असा चप्पल किंवा बूट दर सहा महिन्यांनी किंवा आठ महिन्यांनी बदलण्याचा सल्ला एक्सपर्ट्स देतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List