IND vs ENG 4th Test – …तर जसप्रीत बुमरा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल! टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं भाकीत
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामद्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेत चौथ्या कसोटीतही आपली दमदार खेळी सुरूच ठेवली आहे. मँचेस्टरमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीमध्ये इंग्लंडने आतापर्यंत तरी सामन्यावर मजबूत पकड निर्माण केली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करत असताना इंग्लंडने 600 हून अधिक धावा कुटून काढल्या आहेत. टीम इंडियाच्या गोलंदाजांना इंग्लंडने चोपून काढलं आहे. टीम इंडियाचं मुख्य ब्रम्हास्त्र सुद्धा या सामन्यात आतापर्यंत अयशस्वी ठरलं आहे. जसप्रीत बुमराने 112 धावा खर्च करत फक्त 2 विकेट घेतल्या आहेत. तसेच सामन्यातून काही वेळासाठी तो मैदानाबाहेर सुद्धा गेला होता. त्यामुळे त्याच्या फिटनेसच्या चर्चांना पुन्हा एकदा उधान आलं आहे.
जसप्रीत बुमराच्या फिटनेसचा मुद्धा सध्या चांगला चर्चेत आहे. यावर आता टीम इंडियाचा माजी खेळाडू मोहम्मद कैफने एक भाकीत केलं आहे. त्याने ट्वीटरवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणाला आहे की, “मला वाटतंय की जसप्रीत बुमरा आगामी कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाही. तो कदाचीत निवृत्तही होऊ शकतो. तो सध्या शरीराशी संघर्ष करताना दिसत आहे. या कसोटी सामन्यात त्याचा वेग खूपच कमी झाला आहे. बुमरा एक प्रामाणिक व्यक्ती आहे. जर त्याला वाटत असेल की मी माझे 100 टक्के देऊ शकत नाही तर, तो या फॉरमॅटमधून स्वत:ला वेगळं करेल. विकेट न मिळणं ही वेगळी गोष्ट आहे. परंत बुमराच्या चेंडूंचा वेगही 125-130 किमी प्रतितास इतका कमी झाला आहे, असं म्हणत मोहम्मद कैफने एकप्रकारे चिंता व्यक्त केली आहे.
Bumrah to retire from tests? pic.twitter.com/PnMR2y6oEi
— Mohammad Kaif (@MohammadKaif) July 26, 2025
“बुमराहच्या उत्साहाबद्दल शंका नाही, पण आता त्याचे शरीर हार मानू लागले आहे. या कसोटीतील खराब कामगिरीवरून स्पष्ट होते की भविष्यात त्याला कसोटी सामने खेळण्यास त्रास होईल. कदाचित तो कसोटी क्रिकेटपासून दूर राहील. विराट कोहली, रोहित शर्मा आणि अश्विननंतर आता भारतीय चाहत्यांना बुमराशिवाय खेळ पाहण्याची सवय लावावी लागेल. तथापि, माझी अपेक्षा चुकीची ठरावी अशी माझी इच्छा आहे.” असे कैफ म्हणाला आहे.
जगज्जेतेपदासाठी हिंदुस्थानी युद्ध! ‘राणी’ हम्पीविरुद्ध ‘राजकुमारी’ दिव्या यांच्यात आजपासून संघर्ष
जसप्रीत बुमरा सध्याच्या घडीला टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटमधील महत्त्वाचा गोलंदाज आहे. तसेच तो सामान्य पणे 140 किमी प्रतितास या वेगाने चेंडू टाकतो. परंतु मँचेस्टर कसोटीमध्ये तिसऱ्या दिवशी त्याच्या चेंडूंचा वेग फारच कमी आहे. त्याने जवळपास सर्वच चेंडू हे 130 ते 135 किमी प्रतितास या वेगाने फेकले आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराच्या फिटनेसवर प्रश्चचिन्ह निर्माण केले जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List