संयमाला आवाज असतो!
27 जुलै! हा दिवस केवळ एका नेत्याचा जन्मदिवस नाही… हा दिवस आहे ‘एक विचार, एक तत्त्व आणि एक निखळ नेतृत्व जन्माला आल्याचा’! हा दिवस आहे – ‘महाराष्ट्राच्या जनतेने आपला नेता म्हणून ज्याला मनाने स्वीकारलं, त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा. उद्धव ठाकरे ठराविक चौकटीत न वागता, बाळासाहेबांचे विचार हृदयात आणि काळाच्या गरजा डोळय़ांसमोर ठेवून चालणारे नेते आहेत. शब्दांचे रणशिंग न फुंकता… कृतीतून दाखवलेली लढाई हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्टय़!
कोरोना काळात राज्यभरात भीतीचं वातावरण असताना, ‘मी संयम पाळतोय, तुम्हीही पाळा’ या एका वाक्याने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला शांत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध केलं. कारण हे जनतेचे ‘आपले’ मुख्यमंत्री होते!
शिवसेनेच्या विचारांचा सच्चा वारसदार…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे तेज आणि उद्धव ठाकरे यांचा संयम हीच खरी शिवसेनेची ओळख! शिवसेना म्हणजे जनतेच्या वेदनांना आवाज देणारी भूमिका! उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका दिली सत्याला धरून, निर्णयाला बांधून आणि कार्यकर्त्यांच्या हक्कासाठी झगडून! उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना केवळ आदेश देत नाहीत, त्यांच्या मनात झिरपतात, कार्यकर्त्यांच्या मनात नवचेतना निर्माण करतात. त्यांनी शिवसेना जपली. तिचा आत्मा जिवंत ठेवला. माणूस खुर्चीने मोठा होत नाही, सिद्धांत आणि मूल्यांनी मोठा होतो, ही शिकवण आम्हाला उद्धव ठाकरे यांनी दिली आहे!
उद्धव ठाकरे यांचा आजचा वाढदिवस केक कापून साजरा करायचा दिवस नाही, तर विचारांची मशाल पेटवण्याचा दिवस आहे. चला, प्रत्येक कार्यकर्त्याने ठरवूया – आजपासून आपली प्रत्येक कृती, प्रत्येक लढा आणि प्रत्येक निर्धार हा उद्धव ठाकरे यांच्या नावाला साजेसा असला पाहिजे! – आतुलराज नागरे, राज्य संघटक, शिवसेना
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List