धक्कादायक! होमगार्ड भरती परीक्षेदरम्यान तरुणी बेशुद्ध, रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच सामूहिक अत्याचार

धक्कादायक! होमगार्ड भरती परीक्षेदरम्यान तरुणी बेशुद्ध, रुग्णालयात नेत असताना रुग्णवाहिकेतच सामूहिक अत्याचार

होमगार्ड भरतीच्या परीक्षेदरम्यान रनिंग करताना महिला उमेदवार बेशुद्ध पडली. तिला तात्काळ रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात होते. मात्र प्रवासादरम्यान रुग्णवाहिकेतच तिच्यावर सामूहीक बलात्कार झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घटना उघडकीस येताच रुग्णवाहिका चालक आणि तंत्रज्ञांना पोलिसांनी अटक केली आहे.

बिहारच्या गयाजी जिल्ह्यात ही लज्जास्पद घटना घडली आहे. पीडित तरुणी बीएमपी-3 मध्ये होमगार्ड भरतीची परीक्षा देण्यासाठी गयाजी येथे आली होती. यावेळी रनिंग चाचणीदरम्यान ती बेशुद्ध पडली. तिला रुग्णालयात नेले जात असतानाच धावत्या रुग्णवाहिकेत तिच्यवर सामूहीक बलात्कार करण्यात आला. शुद्धीवर आली तेव्हा तिने रुग्णालयातील डॉक्टरांना बलात्काराची माहिती दिली.

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णवाहिकेत 4 ते 5 लोक होते. पीडितेने पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर बोधगया एसडीपीओ सौरभ जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजवरून दोन्ही आरोपींची ओळख पटवत पोलिसांनी दोन तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

रुग्णवाहिका चालक विनय कुमार आणि तंत्रज्ञ अजित कुमार अशी अटक आरोपींची नावे आहेत. घटनास्थळी पुरावे गोळा करण्यासाठी एफएसएल पथकही पाठवण्यात आले. या प्रकरणी बोधगया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नोकरी मागताच सरकार संतापले; कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला? बेरोजगार तरुणावर अजितदादा खेकसले नोकरी मागताच सरकार संतापले; कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला? बेरोजगार तरुणावर अजितदादा खेकसले
मला सरकारी नोकरी द्या, अशी मागणी करणाऱ्या तरुणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कुठं काय बोलायचं ते कळतं का...
देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती, कोटय़वधींचा खर्च पाण्यात
माणिकराव कोकाटे शनिचरणी
सार्वजनिक गणेशोत्सवाचा मराठी फलक उतरवला. कर्नाटकची सीमाभागात मराठी भाषिकांवर पुन्हा मुजोरी
दुबेंची तंतरली… महाराष्ट्र सदनात ‘प्रसाद’ मिळेल या भीतीने कार्यक्रमाला दांडी
मालदीवला 4,850 कोटींचे कर्ज देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा
साय-फाय – माइटोकॉन्ड्रियलपासून मुक्ती?