देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या छताला भ्रष्टाचाराची गळती; भाविकांकडून संताप व्यक्त

देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराच्या छताला भ्रष्टाचाराची गळती; भाविकांकडून संताप व्यक्त

>> सुनील उंबरे

महायुती सरकारच्या कार्यकाळात सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळल्याचे दिसत आहे. या सरकारच्या कार्यकाळात रस्त्यापासून शाळेच्या कामांपर्यंत सर्वत्र भ्रष्टाचार होत आहे. भ्रष्टाचार एवढा वाढला आहे की, सत्ताधाऱ्यांनी देवालाही सोडले नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या कामातही भ्रष्टाचार झाल्याची चर्चा असून याचा फटका दर्शनाला येणाऱ्या भाविकांना बसत आहे. हलक्या पावसाच्या सरींमुळे मंदिरालाच गळती लागली आहे. त्यामुळे भाविकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातन सौंदर्य जतन करणे त्याचे संवर्धन करण्याचे काम भारतीय पुरातत्व विभागाकडून सुरु आहे. मंदिर संवर्धनाच्या कामासाठी गेल्या तीन वर्षात 50 कोटीहून अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र, मंदिराच्या छताची गळती रोखण्यात मंदिर समितीला यश आलेले नाही. गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या हलक्या पावसाच्या सरींमुळे मंदिराच्या छताला मोठी गळती लागल्याने, जतन आणि संवर्धनाच्या कामाची पोलखोल झाली आहे.

पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी राज्यशासनाने सुमारे 150 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. 2023 पासून या कामाला सुरवात झाली आहे. या आराखड्यामध्ये विठ्ठल मंदिर, सभामंडप, शिखर, रुक्मिणी मंदिर, महालक्ष्मी मंदिर, नामदेव पायरी, नगारखाना, बाजीराव पडसाळ, विनायक मंदिर, व्यंकटेश मंदिर, टेन्साईल वर्क (आतील व बाहेरील), दर्शनबारी, स्ट्रक्चरल ऑडीट, वॉटर सप्लाय व ड्रेनेज, इलेक्ट्रीकल वर्क, साऊंड सिस्टीम, फायर फायटींग सिस्टीम, लक्ष्मण पाटील देवस्थान, अंबाबाई मंदिर, श्री रोकडोबा मंदिर, श्री सोमेश्वर मंदिर, श्री विठ्ठल मंदिर सभामंडप सागवाणी काम, इतर परिवार देवता मंदिरे आणि संत नामदेव महाद्वार आदी कामांचा समावेश आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिपत्याखाली गेल्या तीन वर्षापासून ही कामे सुरु आहेत. ही कामे अतिशय संथगतीने आणि निकृष्ट दर्जाची होत असल्याची तक्रार वारकरी संघटनासह इतर सामाजिक संघटनांनी केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करीत मंदिर समितीने ही कामे तशीच सुरु ठेवली. नुकत्याच झालेल्या हलक्या पावसाने या कामांची पोलखोल झाली आहे.

श्री विठ्ठल मंदिराचा गाभारा, चोखांबी, सोळखांबी, मुखदर्शन दरवाजा आदी भागात गळतीमुळे पावसाच्या पाण्याच्या धारा लागल्या आहेत. या पावसाच्या धारामधून वाट काढत वारकरी भाविकांना श्री विठू रखुमाईच्या दर्शनाला जावे लागते. मंदिराच्या जतन आणि संवर्धन कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करुनही मंदिराची परिस्थिती जैसे थे असेल तर निधीची गळती कशी आणि कुठे झाली याची चौकशी होणे गरजेचे आहे, अशा शब्दांत भाविकांनी संताप व्यक्त केला.

सरकारने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी
पंढरपूरचा पांडुरंग हा गरिबांचा देव आहे. शेतकरी, कष्टकरी भक्तांच्या, देवाचे मंदिर अनादी काळ सुखरुप रहावे, त्याचे पुरातन सौंदर्य खुलून दिसावे यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 73 कोटी रुपयांचा निधी देऊ केला होता. या निधीतून भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. हे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामाविषयी तक्रार करुन ही मंदिर समिती तक्रारीची दखल घेत नाही.आम्ही वेळोवेळी लेखी तक्रारी केल्या आहेत मात्र कोणीही गांभीर्याने पहात नाही. गेली दोन दिवस पंढरपूर मध्ये हलका पाऊस पडत आहे. छोट्या पावसात मंदिराच्या बहुतांश छताला गळती लागली आहे. इतरही कामे निकृष्ट दर्जाची सुरु आहेत. शासनाने 150 कोटींच्या या कामाची चौकशी करुन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
– गणेश अंकुशराव, सामाजिक कार्यकर्ते, पंढरपूर

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नोकरी मागताच सरकार संतापले; कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला? बेरोजगार तरुणावर अजितदादा खेकसले नोकरी मागताच सरकार संतापले; कुठं काय बोलायचं ते कळतं का तुला? बेरोजगार तरुणावर अजितदादा खेकसले
मला सरकारी नोकरी द्या, अशी मागणी करणाऱ्या तरुणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आज चांगलेच संतापले. कुठं काय बोलायचं ते कळतं का...
देवाला तरी सोडा! पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला गळती, कोटय़वधींचा खर्च पाण्यात
माणिकराव कोकाटे शनिचरणी
सार्वजनिक गणेशोत्सवाचा मराठी फलक उतरवला. कर्नाटकची सीमाभागात मराठी भाषिकांवर पुन्हा मुजोरी
दुबेंची तंतरली… महाराष्ट्र सदनात ‘प्रसाद’ मिळेल या भीतीने कार्यक्रमाला दांडी
मालदीवला 4,850 कोटींचे कर्ज देणार; पंतप्रधान मोदींची घोषणा
साय-फाय – माइटोकॉन्ड्रियलपासून मुक्ती?