अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी, संजय राऊत यांचा घणाघात

अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी, संजय राऊत यांचा घणाघात

”भाजपच्या काळात कुणाला कधी अटक होईल ते सांगता येत नाही. एकनाथ खडसे गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तुटून पडले आहेत. त्यामुळेच आज त्यांच्या कुटुंबावर धाड टाकली आहे. पोलीस व पोलिसांची यंत्रणा ही भाजप विरोधींना त्रास देण्यासाठीच आहे”, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचा जावई प्रांजल याला पुण्यातील रेव्ह पार्टीप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी भाजप व गिरीश महाजनांवर निशाणा साधला. ”या सरकारच्या काळात कधी कुणाला अटक होईल, कधी कुणावर गोळीबार होईल हे सांगता येत नाही. सरबत पिणाऱ्या माणसालाही दारू पितो म्हणून अटक होऊ शकते. पोलीस व पोलिसांची यंत्रणा ही भाजप विरोधांना त्रास देण्यासाठीच आहेत. दोन दिवसांपासून एकनाथ खडसे सरकारविरोधात व खासकरून गिरीश महाजन यांच्याविरोधात ठामपणे बोलत आहेत, पुराव्यांसह बोलत आहेत. त्यानंतर पुढल्या चोवीस तासात त्यांच्या जावयाविरोधात ही कारवाई झाली. एकनाथ खडसेंच्या आरोपांची चौकशी होत नाही. पण जो आरोप करतो त्यांच्या घरावर धाडी टाकली जाते. ही पार्टी, ती पार्टी. अख्खा भाजप म्हणजेच रेव्ह पार्टी आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

”नाशिक मध्ये शिवसेनेच्या लोकांचा मिस्टर महाजन भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेत आहेत. भाजपवाल्यांनी आधी त्यांच्यावर आरोप केले. आता त्यांना दबाव टाकून त्यांना भाजपात यायला सांगितले व भाजपात येण्याआधी त्यांच्यावरचे गुन्हे काढून टाकले. आमचे बडगुजर होते त्यांच्यावर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल केले. ते भाजपात गेले त्यानंतर सगळे गुन्हे रफादफा झाले, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोहित पवार यांची महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड रोहित पवार यांची महाराष्ट्र कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्यासह सचिवपदी...
WCL 2025 – एबी डिव्हिलियर्सच्या वादळात ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, 39 चेंडूत ठोकलं खणखणीत शतक
नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला
स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक भाजप आमदारांनी सर्वपक्षीय आघाडीसोबत लढवावी; अभिजित पाटील यांची ऑफर
WCL 2025 – आधीही खेळलो नाही, आताही खेळणार नाही.. INC Vs PNC सामन्यावर शिखर धवनच तडाखेबंद उत्तर
Ratnagiri News – सती चिंचघरी विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम; 1000 राख्यांद्वारे जवानांना मानवंदना
एचआयव्हीची सुरुवातीची लक्षणे कोणती? शरीरात दिसतात हे बदल