पुण्यातील खराडीत मध्यरात्री रेव्ह पार्टी, गुन्हे शाखेचा छापा; बड्या नेत्याचा जावई, तरुणींसह सात जण ताब्यात
पुणे शहरातील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडीतील एका खासगी रेस्ट हाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास धडक कारवाई केली. या छाप्यात दोन तरुणींसह पाच पुरुष, असे एकूण सात जण ताब्यात घेण्यात आले असून, घटनास्थळी गांजा, कोकेन आणि इतर अंमली पदार्थांचा मोठा साठा सापडला आहे. विशेष म्हणजे, या पार्टीमध्ये राज्यातील एका बड्या नेत्याचा जावई उपस्थित असल्याची माहिती मिळाली आहे, ज्यामुळे खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला संबंधित ठिकाणी पार्टी सुरू असून पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांचा वापर होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रात्री साडेतीनच्या सुमारास गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी तेथे प्रतिबंधित पदार्थ, मद्याचे बाटल्या, हुक्का साहित्य आढळून आले. पोलिसांनी येथून दोन महिला आणि पाच पुरुषांना ताब्यात घेतले आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List