स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल
भारतीय स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला जिरा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्याचा उपयोग हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठी देखील होतो. सामान्यपणे जिऱ्याचा वापर हा फोडणीसाठी किवा स्लाडमध्ये करतात. रायताचा स्वाद वाढवण्यासाठी देखील त्यामध्ये जिरे टाकले जातात. तुम्हाला माहिती आहे का? जिरे हा व्हिटॅमिन बी 12 चा एका चांगला स्त्रोत आहे. हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे, व्हिटॅमिन बी 12 आपल्या शरीरासाठी खूप गरजेच असतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमी असेल तर तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
शरीरात जर व्हिटॅमिन बी 12 कमी असेल तर कोणत्या समस्या निर्माण होतात?
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमी असेल (Vitamin B12 Deficiency) तर तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. ज्यामध्ये सारखं थकल्यासारखं वाटणं, शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता. मन थकल्यासारखं वाटणं, मानसिक भ्रम,मज्जासंस्थेच्या समस्या आणि अशक्तपणा अशा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, त्यामुळे आपल्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 चं प्रमाण आवश्यक मात्रेत असणं गरजेच असंत. आता तुम्हाला असा प्रश्न नक्कीच पडला असणार की व्हिटॅमिन बी 12 नेमकं कोणत्या पदार्थांमधून मिळतं, तर व्हिटॅमिन बी 12 चे अनेक स्त्रोत आहेत, मात्र यातील सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे आपल्या सर्वांच्या घरात आढळणारे जिरे. जिरे हा व्हिटॅमिन बी 12 चा सर्वात उत्तम स्त्रोत असून, तुम्ही नियमितपणे जर जिऱ्याचं सेवन केलं तर तुमच्या शरीरामधील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून निघू शकते.
जिऱ्याचं सेवन कसं करायचं?
जिऱ्याला शास्त्रीय भाषेत Cuminum cyminum नावानं ओळखलं जातं. जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 मोठ्या प्रमाणात आढळून येतं. तुमच्या शरीरामध्ये निर्माण झालेली व्हिटॅमिन बी 12 कमी भरून काढण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात जिऱ्याचा वेगवेगळ्या पद्धतीनं वापर करू शकता. तुम्ही जिऱ्याची पावडर करून ती दही आणि सुपात मिसळून सेवन करू शकता. त्याचप्रमाणे विविध पदार्थांमध्ये फोडणीसाठी जिऱ्याचा वापर करू शकता. त्यामुळे तुमच्या पदार्थांचा स्वाद तर वाढेलच सोबतच तुमच्या शरीरात असलेली व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता देखील दूर होईल.
टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारीत आहे, त्यामुळे कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List