डॉ. दीपक टिळक यांचे निधन

डॉ. दीपक टिळक यांचे निधन

‘केसरी’चे विश्वस्त-संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती व लोकमान्य टिळक यांनी स्थापन केलेल्या अनेक संस्थांचे आधारवड डॉ. दीपक जयंतराव टिळक यांचे अल्पशा आजाराने बुधवारी पहाटे निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात चिरंजीव डॉ. रोहित टिळक, कन्या डॉ. गीताली टिळक, स्नुषा डॉ. प्रणिती रोहित टिळक, नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. टिळक हे मागील काही दिवसांपासून आजारी होते. मागील आठवडय़ात त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते घरी परतले होते. पहाटे त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे पार्थिव आधी केसरीवाडय़ातील निवासस्थानी आणि नंतर टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ठेवण्यात आले. दुपारी 12.30च्या सुमारास डॉ. टिळक यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पत्रकारिता, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, साहित्य यासह विविध क्षेत्रांतील नामवंत मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, सिम्बायोसीस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां.ब. मुजुमदार, ‘तरुण भारत’चे संपादक किरण ठाकूर, ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. सुवर्णा साठे, विद्यापीठाचे सचिव अजित खाडिलकर, माजी आमदार रवींद्र धंगेकर, अभय छाजेड, रवींद्र माळवदकर, सिम्बायोसीसच्या प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर आदींनी डॉ. टिळक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

डॉ. दीपक टिळक यांचा जन्म पुण्यात झाला. प्राथमिक व उच्च शिक्षण पुण्यातच झाले.डॉ. टिळक यांचा पी.के. ऊर्फ अण्णा पाटील फाउंडेशनद्वारे पुरुषोत्तम पुरस्कार, सुशील सोशल फोरम पुरस्कार, आचार्य अत्रे आदी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला होता. ‘तायोतोशी ज्युदो-कराटे,’ ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक-आधुनिक भारताचे जनक,’ ‘इंदुकिरण,’ ‘बिझनेस एथिक,’ ‘इव्हेंट मॅनेजमेंट,’ न्यू सोशल मीडिया आणि ‘स्वराज’ भाग 1 व 2 आदी ग्रंथसंपदा डॉ. दीपक टिळक यांच्या नावावर आहे. दरम्यान लोकमान्यांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा वारसाही डॉ. दीपक टिळक यांनी पुढे नेला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय ‘या’ लक्षणांवरून ओळखा आतड्यांचे आरोग्य बिघडलं, सुधारण्यासाठी करा हे उपाय
रोजच्या या धावपळीच्या आयुष्यात विशेषत: वारंवार प्रवास करणाऱ्या लोकांना अनेकदा खाण्यापिण्याचे भान राहत नाही, त्यामुळे अनेकदा आपले खाण्यावर नियंत्रण राहत...
Video – ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय?
ही जर का परिस्थिती राज्याची आली असेल तर मग विधानभवनाला अर्थ काय? विधिमंडळातील राड्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला घेरले
Ratnagiri News – वाटद MIDC विरोधाचा आवाज बुलंद होणार! 19 जुलैला ॲड.असीम सरोदे यांची खंडाळ्यात जनआक्रोश सभा
‘हिंदीची सक्ती हवीच कशाला?’ उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री फडणवीसांना दिले पुस्तक भेट
Video – उपमुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल तर करत नाही ना? भास्कर जाधव यांचा सवाल
Video – म्हाडामार्फत पदपथावर झालेले बांधकाम तोडणार का? पदपथावर असणारे होर्डिंग काढणार का? वरुण सरदेसाई यांचा सवाल