रणवीरच ठरला ‘धुरंधर’! प्रभासच्या ‘द राजा साब’ने घेतला धसका
साउथ फिल्म इंडस्ट्रीचा बाहुबली म्हणजेच प्रभासच्या ‘द राजा साब’ चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाचे प्रदर्शन वारंवार पुढे ढकलले जात आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. ‘द राजा साब’ 5 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. परंतु आता पुन्हा एकदा बातमी अशी आहे की, प्रभासच्या या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाशी टक्कर टाळण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
कोइमोईच्या वृत्तानुसार, प्रभासचा आगामी हॉरर-कॉमेडी चित्रपट आता पुढच्या वर्षी 2026 मध्ये मोठ्या पडद्यावर येईल. निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट एक महिना पुढे ढकलली आहे. मारुती दिग्दर्शित ‘द राजा साब’ हा चित्रपट 9 जानेवारी 2026 ला मकर संक्रांतीच्या आधी थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकतो.
‘द राजा साब’ हा चित्रपट ‘धुरंधर’ चित्रपटाशी टक्कर घेतल्यास त्याला मोठे नुकसान सहन करावे लागले असते. परंतु वृत्तानुसार टक्कर टाळल्यानंतरही, प्रभासचा चित्रपट पहिल्या दिवशी त्याच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या 4 चित्रपटांचा विक्रम मोडू शकणार नाही. ‘द राजा साब’ पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 50 कोटी कमवू शकतो. चित्रपटाने हा आकडा गाठला तर तो प्रभासच्या कारकिर्दीतील पाचवा सर्वाधिक ओपनिंग चित्रपट ठरेल.
‘द राजा साब’ची रिलीज डेट दुसऱ्यांदा बदलण्यात आली आहे. प्रभासचा चित्रपट यापूर्वी 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. निर्मात्यांनी रिलीज डेट 5 डिसेंबरपर्यंत वाढवली होती. आता रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ची रिलीज डेट समोर आल्यानंतर ‘द राजा साब’ची रिलीज डेट पुन्हा एकदा बदलण्यात आली आहे. प्रभास स्टारर या चित्रपटात संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन आणि रिद्धी कुमार हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘द राजा साब’ तेलुगू, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List