अमिताभ बच्चन ‘या’ शोच्या एका एपिसोडसाठी घेताहेत 5 करोड, वाचा सविस्तर
अमिताभ बच्चन वयाच्या 82 व्या वर्षी आजही चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. येत्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा ते आपल्याला कौन बनेगा करोडपती या शोचे होस्टींग करताना दिसणार आहेत. या शोचा 17 वा सीझन येणार आहे. शो संदर्भातील प्रोमो आता प्रदर्शित होऊ लागले आहेत. तब्बल 17 वर्षे झाल्यानंतरही या शोची लोकप्रियता अबाधित आहे. त्यामुळेच या शोचे चाहते आता नवीन शोसाठी उत्सुक आहेत. हा सीझन येत्या 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. दरवेळी प्रमाणे यावेळीही अमिताभ बच्चन या शोमध्ये होस्ट म्हणून दिसणार आहेत.
अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून शो होस्ट करत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार, अमिताभ या सीझनच्या एका एपिसोडसाठी 5 कोटी रुपये फी घेत आहेत. परंतु याबद्दल अधिकृतपणे कोणतीही पुष्टी झालेली नाही. अमिताभ बच्चन हे या शोचे खऱ्या अर्थाने प्राण आहेत. या शोसाठी होस्टींग करण्यासाठी शाहरुखलाही संधी मिळाली होती. परंतु या शोमध्ये अमिताभ बच्चन यांच्याइतका जीव कुणीच ओतला नाही. त्यामुळेच केबीसी आणि अमिताभ बच्चन हे समीकरण बनलेले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List