महाराष्ट्राप्रमाणेच बिहारची निवडणूक देखील हायजॅक करायचा प्रयत्न सुरू आहे – संजय राऊत
बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणूकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या घोटाळ्याबाबत बातम्या देणाऱ्या एका पत्रकारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप व निवडणूक आयोगाला फटकारले आहे.
”इलेक्शन कमिशन व भाजप हातात हात घेऊन काम करत आहेत. इलेक्शन कमिशन देशाचा इलेक्शन कमिशन नाही तर तो भाजपचा इलेक्शन कमिशन आहे. सर्व राज्यांमध्ये असेच आहे. निष्पत्क्ष निवडणूका होण्याची अपेक्षा आम्ही ठेवत होतो पण आता तसं होत नाही. निवडणूक आयोग हे भाजपचे एक ऑफिस आहे तिथून भाजपला जे हवे ते केले जाते. जर एखाद्या पत्रकाराने जर निवडणूक आयोगाचा घोटाळा समोर आणला आहे. तर त्याच्यावर एफआयर करायची गरज नाही. त्याउलट त्याने जे काही समोर आणले आहे ते सुधारण्याची गरज नाही. या देशात आता ना लोकशाही आहे, ना व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ना फ्रिडम ऑफ स्पीच आहे. त्यामुळे हे सर्व असे वागत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. तसेच ”महाराष्ट्रा प्रमाणे बिहारची निवडणूकही हायजॅक करायचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याने क्रांती होईल. बिहार ही क्रांतीची भूमी आहे. जेव्हा जेव्हा देशात क्रांती झाली ती महाराष्ट्र व बिहारमधून झाली आहे”, असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे दिल्ली दौरा
”उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा ठरण्याची शक्यता आहे. त्याची आखणी आम्ही सगळे मिळून करत आहोत. काल काँग्रेसचे सरचिटणीस वेणूगोपालजी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. उद्धव ठाकरे यांनी इंडिया ब्लॉकच्या बैठकीची मागणी केली होती. लोकसभेनंतर बैठक झाली नव्हती. त्यामुळे सर्वांची एकत्र बैठक घेऊन राष्ट्रीय राजकारणाबाबत एक भूमिका घेणं गरजेचं आहे असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. सध्या 19 तारीख ठरवली आहे. पण अद्याप ही तारिख नक्की नाही, असे संजय राऊत म्हणाले.
मराठीचा आग्रह धरला की भोजपूरी कलाकारांना मिरच्या झोंबतात
”महाराष्ट्रात राहून मराठी बोलणार नाही, अशी मस्ती कशी सहन केली जाईल? ममता बॅनर्जी बोलल्या की मी बंगालची बोलणार, आसामचे मुख्यमंत्री बोलले की मी आसामीच बोलणार. तिथे कुणी प्रश्न उपस्थित करत नाही. पण महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला की भोजपूरी कलाकारांना मिर्च्या झोबंतात. तुम्ही इथे रोजीरोटीसाठी येतात, तुमचे कुटुंब वेगवेगळ्या राज्यात आहेत. तरिही महाराष्ट्र मुंबई तुम्हाला सामावून घेतोय. आमचं मन मोठं आहे. तर ही मस्ती कशाला, तोंड उघडू नका ना. पण मी मराठी बोलणारच नाही, अशी मस्ती समोर आली की कानफाडात बसते, असे संजय राऊत यांनी ठणकावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List