‘बॅटल ऑफ गलवान’ साठी सलमान खान सज्ज
बाॅलीवूडचा भाईजान आता ‘सिकंदर’ नंतर, ‘बॅटल ऑफ गलवान’ च्या तयारीत व्यस्त आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या लूकचे खूप कौतुक झाले आहे. यामध्ये सलमान खान एका अनोख्या अवतारात दिसत आहे.
‘बॅटल ऑफ गलवान’चे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत. या चित्रपटात चित्रांगदा सिंग पहिल्यांदाच सलमान खानसोबत दिसणार आहे.
सलमानचे चित्रपट ईदला प्रदर्शित होतात. परंतु मिळालेल्या वृत्तानुसार सुपरस्टारचा हा चित्रपट ईदच्या निमित्ताने प्रदर्शित होणार नाही. पीटीआयशी बोलताना सलमान खानने त्याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट सांगितली. तो म्हणाला, “हा चित्रपट जानेवारीमध्ये येईल.”
2020 मध्ये गलवान खोऱ्यात हिंदुस्थानी आणि चिनी सैनिकांमधील संघर्षावर आधारित सलमान खानच्या ‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट बेतला आहे. या चित्रपटातील युद्धाच्या विषयामुळे चाहत्यांमध्ये या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. सलमान खानने पीटीआयशी बोलताना त्याच्या चित्रपटाबद्दल सांगितले की, “या चित्रपटामध्ये काम करणे हे फार आव्हानात्मक आहे. दिवसागणिक या चित्रपटाचे शूटिंग करणे हे कठीण होत जात आहे. याकरता वेळेची गणितं सांभाळणं हे खूप गरजेचं झालेलं आहे. पूर्वी आठवड्यातून एक किंवा दोन दिवस शूटिंग असायचे. आता मात्र अधिक वेळ काढावा लागणार आहे.
अधिक बोलताना सलमान पुढे म्हणाला, “मी लडाखमध्ये उंचावर शूटिंग करत आहे. यासाठी खूप प्रशिक्षण घ्यावे लागत आहे.” अंग गोठवणारी थंडी आणि थंड पाण्यात शूटिंग करावे लागत आहे. मी चित्रपट साइन केला तेव्हा मला तो अद्भुत वाटला. पण तो खूप कठीण आहे. मला 20 दिवस लडाखमध्ये राहावे लागणार आहे. त्याचबरोबर हाडे गोठवणाऱ्या थंड पाण्यात किमान 7 ते 8 दिवस शूटिंग करावे लागणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List