पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय कधी घेणार? सुनील प्रभू यांचा विधानसभेत सवाल
पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय कधी घेणार? असा प्रश्न विधानसभेत आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद आणि आमदार सुनील प्रभू यांनी सरकारला विचारला आहे.
यावेळी बोलताना सुनील प्रभू म्हणाले आहेत की, “गोरेगाव मिठानगरमधिल देखील मूनही महानगरपालिका वसाहत आहे. तेथील निवृत्त कर्मचाऱ्यांना महापालिकेने घर द्यावं, असं वाटतं. मुंबई महानगरपालिकेने रिडेव्हपलमेंट करावं, असा प्रस्ताव आहे. मुंबई शहरासाठी जसा म्हाडाच्या बाबतीत निर्णय केला, तसेच मुंबई महानगरपालिकेच्या जमिनीवर राहणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना घरे मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय किती दिवसांत घेणार? याचा फायदा मुंबईतील सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेल.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List