धान्य खरेदी योजनेत भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या नावावर दलालांची लूट – नाना पटोले
राज्यात केंद्र सरकारच्या आदेशानुसार सुरू असलेल्या धान्य खरेदी योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे, असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार नाना पटोले आज विधानसभेत बोलताना म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, “मागील अधिवेशनातही मी हा मुद्दा सभागृहात मांडला होता. तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजित पवार यांनी बैठक घेऊन या प्रश्नाचे निराकरण करण्याचे तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले होते.”
विधानसभेत बोलताना नाना पटोले म्हणाले की, “ही योजना शेतकऱ्यांच्या मालाला योग्य मोबदला मिळावा, त्यांना न्याय मिळावा यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही शेतकऱ्यांच्या हिताची योजना असली तरी प्रत्यक्षात दलालांच्या हातात ती खेळू लागली आहे. या योजनेंतर्गत सुरू असलेल्या भ्रष्टाचारामुळे सरकारी तिजोरीला जबर नुकसान सहन करावे लागत आहे.”
पटोले म्हणाले, “सरकारच्या निधीवर उघडपणे डल्ला मारला जात आहे, राज्याची तिजोरी लुटली जात आहे आणि प्रत्यक्ष लाभ मात्र दलालांनाच मिळतो. हा प्रश्न आता अधिक गंभीर झाला आहे. त्यामुळे याचा तातडीने निकाल लावणे अत्यावश्यक आहे. या दलालांवर नेमकी काय कारवाई करण्यात येणार आहे, याचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात द्यावे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List