Health Tips – निरोगी राहण्यासाठी रोज सकाळी किमान एक वाटी ‘हे’ खायलाच हवे, वाचा
आपण दिवसाची सुरुवात करताना काय खायला हवे असा प्रश्न पडतो. दिवसाची सुरुवात करताना आपला नाश्ता हा अतिशय पौष्टिक असायला हवा. नाश्ता हा पौष्टिक असेल तर आपण दिवसभर काम करण्यासाठी सुद्धा तयार राहतो. दिवसभर पूर्णपणे उर्जावान राहण्यासाठी आहारामध्येही तसे बदल करायला हवे. नाश्ता हा इतका उत्तम हवा की, असा नाश्ता केल्यामुळे दिवसभर तुम्ही फ्रेश राहाल. शिवाय जो नाश्ता तुम्ही कराल त्याचे शरीरासाठी सुद्धा मुबलक फायदे असतील. म्हणूनच पोटभरीचा नाश्ता हा कायमच बेस्ट पर्याय मानला जातो. अनेकजण दिवसाची सुरुवात करताना, मोड आलेले कडधान्य खातात. मोड आलेल्या कडधान्याला पौष्टिकतेचे पावरहाऊस म्हटले जाते.
Health Tips – ड्रायफ्रुटस् भिजवुन खाण्याचे आहेत अगणित फायदे, वाचून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल
मूळातच मोड आलेली कडधान्य ही आपल्या शरीरासाठी ही फार गरजेची मानली जातात. मोड आलेली कडधान्य खाल्ल्यामुळे, आपल्या शरीरासाठी भरपूर पोषक तत्वे मिळतात.
मोड आलेल्या कडधान्यामधून आपल्या शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी, ई मिळतात. तसेच मोड आलेल्या कडधान्यामध्ये लोह आणि मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.
मोड आलेल्या कडधान्यामध्ये जीवनसत्वे तसेच खनिजांचे प्रमाणही खूप असते. आपल्या आरोग्यासाठी ही जीवनसत्वे खूप गरजेची मानली जातात.
मोड आलेली कडधान्ये आपल्या आरोग्यासाठी विविध पोषक तत्वे देतात. त्याचबरोबरीने आपल्या स्नायूंच्या बळकटीसाठी सुद्धा मोड आलेली कडधान्य फारच उपयुक्त मानली जातात.
Health Tips – ‘हे’ फळ आहे कॅन्सरचा कर्दनकाळ, तुमच्या आहारात या फळाचा समावेश हवाच
पोट तसेच केसांशी संबंधित असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी आपल्या आहारामध्ये मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करणे गरजेचे आहे.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी मोड आलेल्या कडधान्याचे सेवन करणे हे खूप गरजेचे असते.
आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी तसेच कोलस्ट्राॅल कमी करण्यासाठी मोड आलेली कडधान्ये खाणे हे गरजेचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List