तुम्ही फिट आहात की नाही हे घरबसल्या असे चेक करा, मिनिटांत आरोग्याचे रिपोर्टकार्ड
फिटनेस म्हणजे केवळ वजन कमी करणे किंवा मसल्स बनवणे नव्हे तर शरीराची काम करण्याची क्षमता, सहनशक्ती आणि बॅलन्सला सांभाळून ठेवणे देखील यात समाविष्ठ आहे. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुमचे शरीर किती फिट आहे. तर या 5 सोप्यी एक्सरसाईज टेस्ट घरी देखील करुन पाहू शकता…
Dr. Cyriac Abby Philips, जे दि लिव्हर डॉक नावाने सोशल मीडियावर ओळखले जातात.त्यांनी एक पोस्ट शेअर करुन 5 एक्सरसाईज (Simple Exercises to Check Fitness) संदर्भात माहीती दिली आहे. त्यामुळे तुमची मसल्स स्ट्रेंथ, कार्डिओव्हॅस्कुलर हेल्थ आणि स्टॅमिना जाणून घेणे सोपे जाते.
1 ) वन-मिनिट सिट-टू-स्टँड टेस्ट
ही टेस्टच्या पायांची ताकद आणि मोबिलिटीचे मापन करते. ही टेस्ट सांगते की तुमचे पाय किती मजबूत आहेत आणि रोजच्या कामासाठी किती तयार आहेत.
कशी कराल टेस्ट
एक मजबूत खुर्चीवर ( सुमारे 45 सेंटीमीटर उंच ) बसावे
हातांचा छातीवर क्रॉस करावा
1 मिनिटात जेवढ्या वेळा हातांच्या आधारे उभे राहून बसता येते का ते मोजावे.
रिझल्ट (45-59 वर्षांसाठी )-
14 पेक्षा कमी – कमजोर लोअर बॉडी स्ट्रेंथ
14-20 – मध्यम
20 हून जास्त – चांगला फिटनेस
2) थ्री-मिनिट स्टेप टेस्ट
ही टेस्ट हृदय आणि फप्फुसाची क्षमता मोजते. जर हार्ट रेट लवकर नॉर्मल होतो तर तुमची कार्डिओ हेल्थ चांगली आहे.
कशी कराल टेस्ट
12 इंचाची (30 cm) उंच सीडी किंवा पायऱ्यांचा वापर करावा
3 मिनिटे वर खाली अशा पॅटर्नमध्ये चढावे आणि उतरावे. मिनिटांना 24 स्टेप्स
त्यानंतर बसून 30-60 सेकंड आपली नाडी तपासावी
रिझल्ट (40-49 वर्षांसाठी ) –
96 BPM हून जास्त – कमजोर फिटनेस
80 BPM वा त्याहून कमी – चांगली कार्डिओ हेल्थ
3 ) फोरआर्म प्लँक होल्ड
प्लँकने पोटाच्या आणि कोअर मसल्सची ताकत ओळखता येते. जर कोअर मजबूत असल्याने पाठदुखी आणि दुखापतीचा धोका कमी असतो.
कशी कराल टेस्ट
कोपरांना खांद्याच्या खाली ठेवून प्लँक पोझिशनमध्ये यावे
शरीराला सरळ ठेवावे, हिप्स वर खाली करावे
जेवढे शक्य होईल तेवढे पोझिशन होल्ड करावी
रिझल्ट (40-59 वर्षांसाठी )-
30 सेकंदाहून कमी – कमजोर कोर
90-120 सेकंद- चांगला स्टॅमिना
4 ) वॉल – सिट टेस्ट
ही टेस्ट मांड्या आणि पायांची ताकद किती आहे ते सांगते. ही टेस्ट सांगते की तुम्ही किती लांब चालणे-पळणे यास तयार आहात की नाही
कशी कराल टेस्ट
भिंतीला चिकटून उभे राहून पायांना 60 cm पुढे ठेवावे
घुडगे 90°वर दुमडुन बसण्याच्या स्थितीत या
तेवढा वेळ या पोझिशनमध्ये राहाता येईल तेवढे राहा
रिझल्ट (40-59 वर्षांसाठी )
30 सेकंदाहून कमी- कमजोर लोअर बॉडी
75 सेकंदाहून जास्त – मजबूत पाय
5 ) मॉडिफाईड पुश-अप टेस्ट
ही टेस्ट छाती, खांदे आणि भुजांची ताकद मोजते. जर तुम्ही जास्त पुशअप करु शकत नसाल तर अपर बॉडी वर्कआऊटवर लक्ष द्या
येथे पोस्ट पाहा –
The best treatment for fatty liver disease is to prevent it by improving your cardiometabolic health. Here is a small list of tasks that I advise my patients to undergo to assess their “fitness” before I prescribe exercise for treating fatty liver.
1/7 pic.twitter.com/sbx6MWOFMO— TheLiverDoc (@theliverdr) July 1, 2025
कशी कराल टेस्ट
घुडघ्यांवर येत पुश-अप पोझिशनमध्ये यावे
छातीला जमिनीजवळ आणून पुन्हा ही क्रिया करा
जेवढे शक्य आहे तेवढे, पुश-अप करत राहावे
रिझल्ट (40-59 वर्षांसाठी )
10-12 हुन कमी- कमजोर अपर बॉडी
25 हून जास्त – चांगली स्ट्रेंथ
डॉक्टरांनी हे देखील म्हटले आहे की ही टेस्ट फिटनेसची मेडिकल टेस्ट नाही. त्यामुळे कोणत्याही समस्या किंवा प्रश्न आल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List