Weight Loss Fruit – वजन कमी करण्यासाठी हे एक फळ आहारात न विसरता समाविष्ट करा

Weight Loss Fruit – वजन कमी करण्यासाठी हे एक फळ आहारात न विसरता समाविष्ट करा

वजन वाढल्यानंतर ते कमी करणं हा एक मोठा त्रास असतो. वजन कमी करण्यासाठी मग आपण नानाविध डाएट करतो. वजन कमी करण्यासाठी काही फळे ही उपयुक्त मानली जातात. त्यामधील एक महत्त्वाचे फळ म्हणजे पेरू. पेरूमध्ये मुख्य म्हणजे चरबी कमी असते. त्यामुळे पेरु हे फळ वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पेरुमध्ये फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्याचबरोबर पेरू हा व्हिटॅमिन सी चा उत्कृष्ट स्रोत आहे. पेरुमध्ये संत्र्यांपेक्षा 5 पट जास्त व्हिटॅमिन सी असते. याचबरोबरीने जीवनसत्त्वे व्हिटॅमिन ए प्रमाणे , व्हिटॅमिन बी 9 (फोलेट) आणि व्हिटॅमिन के देखील मुबलक आढळतात.

पेरूमध्ये प्रामुख्याने कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फळ अतिशय महत्त्वाचे ठरते.

फायबरचे प्रमाण हे पेरूमध्ये खूप प्रमाणात असते. त्यामुळे बराच वेळ पोट भरल्यासारखे राहते. त्यामुळे अधिक खाणे टाळले जाते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

बद्धकोष्ठता आणि इतर पचनाच्या समस्या असतील तर पेरु खाणे हे सर्वात उत्तम मानले जाते.

कच्च्या लाल पेरूची खासियत म्हणजे याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास ते शरीराला जास्त काळ हायड्रेट ठेवते.

पेरूच्या बिया गॅस आणि पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतात. पेरू हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि अनेक पोषक घटक आढळतात जे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

पेरूमध्ये असलेले फायबर कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करू शकते. पेरूमध्ये नैसर्गिक साखर असते, जी मधुमेहासाठी फायदेशीर मानली जाते.

पेरू त्वचेसाठी फायदेशीर मानला जातो. पेरूमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड करत दिला दणका; पालकमंत्री विखेंच्या कार्यालयाला आली जाग खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड करत दिला दणका; पालकमंत्री विखेंच्या कार्यालयाला आली जाग
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेतील घोटाळा उघड केल्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे....
IND Vs ENG 3rd Test – सामना जिंकूनही इंग्लंडला ICC ने ठोठावला दंड, WTC गुणतालिकेतही बसला फटका
मी पुन्हा येईन! समारोपाचे अंबादास दानवे यांचे जोरदार भाषण
Nanded News – जम्मू काश्मीरच्या राज्यपालांनी राजीनामा द्यावा, पहलगाम हल्ल्यावरून ओवेसी यांची मागणी
बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर चिंता करु नका, रामदेव बाबांनी सांगितला सोपा उपाय
Nanded News – वंचित बहुजन आघाडीच्या युवा आघाडीतर्फे आमदार हेमंत पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारले; अर्बन नक्षलवादाच्या वक्तव्याचा निषेध
विठ्ठल चरणी भाविकांचे भरभरुन दान; देवाच्या खजिन्यात 11 कोटी जमा, गेल्यावर्षीपेक्षा 2 कोटींची वाढ