झारखंडमध्ये चकमकीत दोन नक्षलवादी ठार, एक जवान शहीद
झारखंडमधील बोकारो जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान व नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. या चकमकीत कोब्रा बटालियनचा एक जवान देखील शहीद झाला आहे.
Jharkhand | Security forces neutralised a Sub-Zonal Naxal Commander, Kunwar Manjhi alias Sahdeo Manjhi alias Sade, during an exchange of fire that took place around 6.30 am today in the forest area in Jharkhand’s Bokaro district. An AK-47 rifle was also recovered in the operation… pic.twitter.com/DNjumObEdO
— ANI (@ANI) July 16, 2025
झारखंडच्या गोमिया शहरातील बिरहोर्डेरा जंगलात काही नक्षलवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर या जंगलात जवानांनी शोध मोहिम सुरू केली होती. सकाळी सहाच्या सुमारास ही शोध मोहिम सुरू झाली. यावेळी नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले तर एक जवान शहीद झाला. या चकमकीत 25 लाखांचे बक्षिस असलेला नक्षलवादी कुंवर मांझी उर्फ सहदेव मांझी देखील ठार झाला आहे. या नक्षलवाद्यांकडून जवानांनी एके 47 रायफल जप्त करण्यात आल्या आहेत. अद्याप या जंगलात शोध मोहिम सुरू आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List