भाजप नेत्याची जीभ घसरली; दिग्विजय सिंह यांचा केला मौलाना असा उल्लेख
उत्तर हिंदुस्थानात श्रावण महिना सुरू झाला असून अनेक ठिकाणी कावड यात्रा सुरू आहेत. या कावड यात्रांबाबत मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यावरून वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या पोस्टबाबत प्रतिक्रिया देताना भाजप नेत्याची जीभ घसरली आहे. या नेत्याने दिद्विजय सिंह यांचा मौलाना असा उल्लेख केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दिग्विजय यांनी केलेल्या पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या चित्रात रस्त्यावर कावड यात्रा दाखवली आहे, तर दुसऱ्या चित्रात लोक नमाज पठण करताना दिसत आहेत. पोस्टमध्ये उपस्थित केलेला प्रश्न असा आहे की, ‘एक देश, दोन कायदे?’ या पोस्टवर प्रतिक्रिया देताना भाजप नेत्याची जीभ घसरली आहे. मध्य प्रदेशचे मंत्री विश्वास सारंग यांनी दिग्विजय सिंह यांना ‘मौलाना’ म्हटले आणि ते फक्त सनातन धर्माला विरोध करतात असे म्हटले आहे. विश्वास सारंग म्हणाले की दिग्विजय सिंह हिंदू धर्माचा आणि सणांचा अपमान करत आहे. त्यामुळे त्यांना ‘मौलाना दिग्विजय सिंह’ म्हणणे योग्य ठरेल. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List