Ratnagiri News – राज्य उत्पादन शुल्क विभागाची दिखाऊगिरी! कागदावर फक्त एक कारवाई, गोवा बनावटीची दारू विकणारे मात्र मोकाट
रत्नागिरी जिल्ह्यातील गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे उद्ध्वस्त करा असा आदेश राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिला होता. त्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने कागदावर एक कारवाई करून दाखवली आहे. एक कारवाई करून उत्पादन शुल्क विभागाने स्वतःची पाठ थोपटली असली तरी, गोवा बनावटीची दारू आणून विक्री करणारे मोकाट आहेत.
गोवा बनावटीची दारू रत्नागिरीत आणून विकली जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी परमिट रूमधारक आणि वाईन शॉप व्यवसायिकांनी केल्या होत्या. मात्र रत्नागिरीचा उत्पादन शुल्क विभाग निद्रिस्त होता. अखेर गटारीच्या तोंडावर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन गोवा बनावटीच्या दारूचे अड्डे उद्ध्वस्त करा, असा आदेश दिला. त्या आदेशानंतर उत्पादन शुल्क विभागाने कागदावर एक कारवाई करुन दाखवली आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर गुप्त बातमी मिळाली
गोवा बनावटीच्या दारू वाहतूकीवर कारवाई करा असा आदेश पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर भरारी पथकाने भरारी घेतली. एका चारचाकी वाहनातून गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असल्याची खबर मिळाली. ती गाडी राजापूरात कडली. त्या गाडीत गोवा बनावटीच्या दारूचे 77 बॉक्स सापडले असून दारूसह गाडी जप्त केली आहे.
गोव्याची दारू राजापूरपर्यंत पोहचली कशी?
गोवा-आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर नाकाबंदी असते. उत्पादन शुल्क विभागही या नाक्यावर सक्रिय असतो. अशावेळी 77 बॉक्स गोव्याची दारू घेऊन गाडी राजापूरपर्यंत पोहचली कशी? हा प्रश्न निर्माण झाला. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाची गस्त संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List