Hair Care – केसगळतीवर आता फक्त 10 रुपये खर्च होतील, वाचा
केसांच्या समस्या या दिवसागणिक आता वाढू लागल्या आहेत. धूळ आणि प्रदूषणामुळे केसांची अक्षरशः वाट लागली आहे. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण काय आणि कोणता आहार घेतो यावर अवलंबून असते. केसांची काळजी घेण्यासाठी तेल हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तेलाच्या जोडीने केसांच्या त्वचेसाठी आवश्यक असणारे पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत. साधे घरगुती उपाय आपण अमलात आणून केसांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो. केसांना मास्क लावून केसगळती थांबवू शकतो. घरगुती उपाय केसांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतात. साधे सोपे घरगुती उपाय खास तुमच्यासाठी.
ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडासा दही मिसळा आणि केसांना आणि टाळूवर लावा. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आणि केसांमध्ये चमक आणण्यासाठी ऑलिव्ह तेल सर्वोत्तम आहे.
केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा घालविण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मूळाशी लावावा. किमान 15 मिनिटांनंतर केस स्वच्छ धुवावे.
केसांच्या आरोग्यासाठी दही सुद्धा खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये केसांसाठी आवश्यक असणारी खनिजे असतात. तसेच केसांचा कोरडेपणाही दह्याच्या वापराने दूर होतो. अंघोळ करण्याआधी केसांना किमान 10 मिनिटे दही लावून ठेवावे.
केसगळती रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिंबू. एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आंघोळीच्या आधी हे लिंबाचे मिश्रण केसांमध्ये व्यवस्थित लावा. त्यानंतर केस 20 ते 25 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.
केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी केळी आणि मध हे एक उत्तम कॅम्बिनेशन आहे. कोरड्या केसांसाठी केळी आणि मध एकत्र करून केसांना लावावे. हा केसांचा मास्क किमान 15 मिनिटे ठेवावा. केस मऊसुत होण्यास मदत होते.
अकाली केस पांढरे होणे ही समस्या अनेकांमध्ये दिसून येते. आवळ्याचा रस, लिंबाचा रस, नारळ तेल समप्रमाणात घ्यावे. या मिश्रणाने केसांच्या मूळाशी मालिश करावी. त्यामुळे अकाली केस पांढरे होण्यास प्रतिबंध लागतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List