वाढत्या महागाईत रेल्वेनेही दिला दणका; तिकीट दरांमध्ये केली वाढ

वाढत्या महागाईत रेल्वेनेही दिला दणका; तिकीट दरांमध्ये केली वाढ

देशातील जनता सध्या वाढत्या महागाईत होरपळत आहे. आता त्यातच रेल्वेनेही जनतेला दणका देत तिकीट दरांमध्ये वाढ केली आहे. हे वाढीव दर 1 जुलैपासून लागू होणार आहेत. रेल्वेच्या नवीन दरानुसार सामान्य द्वितीय श्रेणीत 500 किमी पर्यंत प्रवास करण्यासाठी कोणतीही दरवाढ होणार नाही. मात्र, प्रवास 500 किमी पेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर अर्धा पैसे अतिरिक्त द्यावे लागतील.

रेल्वे 1 जुलै 2025 पासून नवीन भाडे दर लागू करणार आहे. या बदलामुळे सामान्य प्रवाशांसह लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. रेल्वेच्या नवीन दरानुसार सामान्य द्वितीय श्रेणीत 500 किमी पर्यंत प्रवास करण्यासाठी भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. मात्र, प्रवास 500 किमी पेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर अर्धा पैसा अतिरिक्त द्यावा लागेल.

मेल/एक्सप्रेस गाड्यांमध्ये (नॉन-एसी) प्रवास करणाऱ्यांना आता प्रति किलोमीटर 1 पैसे जास्त द्यावे लागतील. त्याचप्रमाणे, एसी वर्गाच्या तिकिटात सर्वात मोठा बदल करण्यात आला आहे. तो प्रति किलोमीटर 2 पैशांनी वाढवण्यात आला आहे. उपनगरीय गाड्यांच्या भाड्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाखो दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळेल.

मासिक हंगामी तिकिटांच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. यापूर्वी रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलण्याचा निर्णय घेतला होता. आतापर्यंत, जर तुम्ही रेल्वे तिकीट बुक केले तर तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या चार तास आधी तिकीट कन्फर्म झाले आहे की नाही हे कळते. पण आता रेल्वे एका नवीन प्रणालीवर काम करत आहे. रेल्वे म्हणते की कन्फर्म सीट्स असलेला चार्ट प्रवासाच्या 24 तास आधी जारी केला जाईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;