Pune News – कोकणकड्यावरून उडी घेतली! दरीत आढळले दोघांचे मृतदेह, तलाठी आणि कॉलेज तरुणीचा समावेश

Pune News – कोकणकड्यावरून उडी घेतली! दरीत आढळले दोघांचे मृतदेह, तलाठी आणि कॉलेज तरुणीचा समावेश

पुणे जिल्ह्यातील जुन्नरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जुन्नरच्या आदिवासी भागातील दुर्गावाडी येथे असलेल्या कोकणकडा परिसरातील एका खोल दरीत दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत. मृतांमध्ये श्रीगोंद्याचे तलाठी आणि एका महाविद्यालयीन तरुणीचा समावेश आहे. या दोघांनीही 1200 फूट खोल दरीत उडी घेत जीवन संपवल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दुर्घटना घडूनही पर्यटकांची हुल्लडबाजी सुरुच

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र साहेबराव पारधी (40) आणि रुपाली संतोष खुटाण अशी मृतांची नावे आहेत. रामचंद्र पारधी हे श्रीगोंद्याचे तलाठी होते तर, रुपाली महाविद्यालयीन विद्यार्थिनी होती. दोघेही बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडून पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. यानंतर जुन्नर पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी या घटनेबाबतची माहिती दिली आहे. जुन्नर पोलीस आणि रेस्क्यू टीमने अतिशय कठीण परिस्थितीत मृतदेह दरीतून बाहेर काढले आहेत.

‘नीट’ चाचणीत कमी मार्क पडले, मुख्याध्यापक वडिलांच्या मारहाणीत मुलीचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे दुर्गावाडीचे श्रीगोंदा तालुक्यात तलाठी असलेले रामचंद्र पारधी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. याबाबत त्यांच्या पत्नीने अहिल्यानगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. तर, रुपालीही काही दिवसांपासून बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. यादरम्यान चौकशी सुरू असताना दरीच्या कठड्याच्या टोकावर पुरुष आणि स्त्रीच्या चपला आढळून आल्या होत्या. तसेच जुन्नरच्या रिव्हर्स वॉटर फॉलजवळ पांढऱ्या रंगाची कार काही दिवसांपासून उभी असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना दिसले. त्यामुळे रेस्क्यू टीमने शोध मोहीम आणखी तीव्र केली.

रेस्क्यू टीमला शोध मोहिमे दरम्यान सोमवारी 23 जूनला दरीत रूपाली आणि रामचंद्र यांचे मृतदेह आढळून आले. यानंतर रेस्क्यू टीमने त्यांचे मृतदेह बाहेर काढले असून त्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;