Kitchen Cleaning Tips- किचनमधील लोखंडी तवा, कढईला गंज चढलाय का? करा हे उपाय कढई पुन्हा होईल नव्यासारखी

Kitchen Cleaning Tips- किचनमधील लोखंडी तवा, कढईला गंज चढलाय का? करा हे उपाय कढई पुन्हा होईल नव्यासारखी

लोखंडी भांड्यात अन्न शिजवण्याचे महत्त्व हे खूप आहे. म्हणूनच आपल्यापैकी अनेकांच्या घरात, लोखंडी भांड्याचा वापर हा वाढलेला आहे. परंतु लोखंडी तवा, कढई ही काही काळ न वापरल्यास मात्र या भांड्यांना गंज चढण्यास सुरुवात होते. अशी गंज चढलेली भांडी किचनमध्ये मग ठेवायलाही लाज वाटते. अशावेळी ही भांडी आपण कुठेतरी कोनाड्यात ठेवून देतो. त्यामुळेच या भांड्यांना नवे रुप द्यायचे झाल्यास, लोखंडी कढईची स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे.

लोखंडी कढई स्वच्छ करण्यासाठी सर्वात चांगला आणि स्वस्त उपाय म्हणजे, राखेने ही भांडी साफ करणे. लोखंडी भांडी ही राखेने खूप उत्तम साफ होतात. त्यामुळेच गाव खेड्यांमध्ये आजही भांडी घासण्यासाठी राखेचा वापर केला जातो.

Kitchen Cleaning Tips- स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅन घाणेरडा आणि चिकट झाला आहे का? या टिप्स वापरा काम होईल फत्ते

लोखंडी कढई साफ करण्यासाठी काय वापरावे?

अगदी कमीत कमी पैशांमध्ये लोखंडी कढई साफ करता येऊ शकते.

काॅस्टिक सोडा काळी झालेली कढई स्वच्छ करण्यासाठी सर्वात उपयुक्त मानले जाते. याकरता एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवावे. पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर, त्यात एक चमचा काॅस्टिक सोडा मिसळावा. त्यानंतर काळी झालेली कढई या भांड्यात बुडवून ठेवावी. किमान अर्धा तास ही कढई तशीच ठेवावी. जास्त वेळ ठेवल्यास अधिक उत्तम. या लोखंडी कढईचा काळपटपणा आणि चिकटपणा पूर्णपणे निघून जाईल.

लोखंडी कढई स्वच्छ करण्यासाठी, लिंबू आणि मीठ हे सर्वात बेस्ट. याकरता सर्वात सोपी पद्धत म्हणजे लिंबाच्या रस काढलेल्या साली साठवून ठेवाव्या. या सालींना मीठ लावावे. मीठ लावलेल्या या सालींनी कढई घासून घ्यावी. त्यानंतर एका भांड्यात पाणी गरम करुन त्यात ही कढई ठेवावी. या पाण्यात लिंबाचा रस टाकल्यास अधिक उत्तम रिझल्ट मिळेल. त्यानंतर किमान अर्ध्या तासांनी ही कढई बाहेर काढून स्क्रबरने चांगली घासून घ्यावी.

गंजलेली लोखंडी कढई स्वच्छ करण्यासाठी राख हा सर्वात उत्तम पर्याय आहे. राखेमुळे जमलेली काजळी आणि तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते. भांड्याला राख घासल्यामुळे तेलकटपणा आणि काजळी काढून टाकली जाते. त्यामुळे भांडे नव्यासारखे चमकते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;