अच्छा सिला दिया तुने…प्रियकराच्या मदतीने 9 मुलांच्या आईने नवऱ्यालाच पाठवले यमसदनी अन् झाले दोघेही फरार..

अच्छा सिला दिया तुने…प्रियकराच्या मदतीने 9 मुलांच्या आईने नवऱ्यालाच पाठवले यमसदनी अन् झाले दोघेही फरार..

राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण ताजे असताना मन हेलावणारे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. देशभरातून असंख्य सोनम रघुवंशी आता समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे महिलांप्रमाणेच आता पुरूषही या देशात सुरक्षित नसल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशातील कासगंजमध्ये, 9 मुलांच्या आईने तिच्या प्रियकरासह तिच्याच पतीची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हे प्रकरण पटियाली पोलीस ठाणे परिसरातील भरगेन गावातील आहे. येथे एका बंद वीटभट्टीतून कामगाराचा मृतदेह सापडला. मृताचे नाव रतिराम नट असे आहे. रतिराम कैमगंजचा रहिवासी आहे. आता या प्रकरणात, पोलिसांनी रतिरामची पत्नी रीना आणि तिचा प्रियकर हनीफविरुद्ध नामांकित तक्रार दाखल केली आहे. हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला होता. यावेळी रतिरामची पत्नी रीना त्यांच्या 9 मुलांना सोडून फरार झाली होती. त्याचवेळी, पोलिसांनी संशय आला आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, रतिरामची पत्नी रीनाचे हनीफ नावाच्या तरुणाशी अवैध संबंध होते, असे पोलीस तपासात आढळून आले. हनीफमुळे नवरा बायकोमध्ये बरेच दिवस भांडणे होत होती. या मतभेदांमध्ये रीनाने तिचा प्रियकर हनीफसोबत मिळून रतिरामची हत्या करण्याचा कट रचला. दोघांनीही परिस्थितीचा फायदा घेत रतिरामची वीटभट्टीवर हत्या केली. हत्येनंतर रीना तिच्या 9 मुलांना सोडून पळून गेली.

सध्या पोलीस या दोघांचाही शोध घेत आहे. लवकरच दोघांनाही अटक केली जाईल. जर या हत्येत आणखी कोणी सहभागी असेल तर त्यालाही अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;