ज्येष्ठ साहित्यिक वामन देशपांडे यांचे निधन; रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ साहित्यिक वामन देशपांडे यांचे निधन; रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

ज्येष्ठ साहित्यिक वामन देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. गेले काही दिवस डोंबिवलीतील अरिंदम रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वामन देशपांडे यांचे मंगळवारी सकाळी रुग्णालयातच निधन झाले. कविता, कादंबरी, लेख याचबरोबर धार्मिक विषयावरील प्रदीर्घ लेखन देशपांडे यांनी केले. मसापच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काही वर्षे काम पाहिले. त्यांची सुमारे 125 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रिझर्व्ह बँकेतून निवृत्त झाल्यानंतर वामनराव डोंबिवलीत वास्तव्यास आले. परदेशी असलेला मुलगा आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वामन देशपांडे हे एक मराठी लेखक, समीक्षक, कवी आणि संगीतज्ञ होते. ते अनेक विषयांवर लेखन करत आणि विविध साहित्य संमेलनांमध्ये सक्रिय होते. त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत, ज्यात कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीत आणि भक्तिगीत यांचा समावेश आहे. वामन देशपांडे यांचा जन्म यवतमाळ येथे झाला. त्यांनी कथा, कादंबऱ्या, समीक्षा, भावगीत, भक्तिगीत, संत साहित्य अशा विविध विषयांवर लेखन केले आहे. ते संगीत समीक्षक आणि संगीतज्ञ म्हणूनही ओळखले जातात. ते विविध अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये हजेरी लावत होते. त्यांनी मुलांसाठी संत तुकाराम आणि इतर विषयांवर लेखन केले आहे. त्यांनी सार्थ श्रीज्ञानेश्वरी या ग्रंथाचे भाषांतर केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;