Skin Care- सदाबहार तरुण दिसण्यासाठी फक्त एक चमचा तूप गरजेचे आहे, वाचा तूप लावण्याचे फायदे

Skin Care- सदाबहार तरुण दिसण्यासाठी फक्त एक चमचा तूप गरजेचे आहे, वाचा तूप लावण्याचे फायदे

Skin Care- सदाबहार तरुण दिसण्यासाठी फक्त एक चमचा तूप गरजेचे आहे, वाचा तूप लावण्याचे फायदेआपल्या प्रत्येकाची इच्छा असते की, आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य टिकून राहावे. परंतु वयोमानापरत्वे आपल्या चेहरा कोरडा पडणे, सुरकुत्या येणे हे खूप सर्वसामान्य आहे. रासायनिक उत्पादनांपेक्षा केव्हाही घरगुती उपाय कायम फायदेशीर ठरतात. म्हणूनच चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी तूप हे फार महत्त्वाचे मानले जाते. देशी तूप हे आपल्या प्रत्येकाच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते.

स्त्री असो किंवा पुरुष सौंदर्यासाठी तूपाची महती ही अवर्णनीय आहे. सौंदर्य टिकवण्यासाठी तूपाचा वापर हा फार पूर्वीपासून केला जात आहे. तूप हे आपल्या त्वचेसाठी फार गरजेचे आहे. तूप हे आपल्या चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेला नैसर्गिक चमक तर येतेच, शिवाय आपली त्वचा तरुण दिसू लागते.

 

Skin Care- त्वचा तरुण ठेवण्याचा स्वस्त आणि मस्त फंडा, वाचा सविस्तर

चेहऱ्यावर तूप लावण्याचे फायदे

देशी तूप आपल्या त्वचेसाठी फार गरजेचे मानले जाते. रात्री झोपण्यापूर्वी देसी तूप चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतातच, शिवाय त्वचेला नैसर्गिक चमक येते.

देशी तुपात जीवनसत्त्वे ए, डी, ई आणि के तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात. आपल्या त्वचेच्या पेशींसाठी खूप आवश्यक असतात.

 

चेहऱ्याला तूप लावल्यामुळे, चेहरा हा मऊ मुलायम होतो. तसेच चेहऱ्यावर चमक निर्माण होते.

 

चेहऱ्यावर तूप लावल्याने, त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. यामुळे चेहरा कोरडा पडण्याची शक्यता खूपच कमी होते.

आपल्या डोळ्याभोवती असलेली काळी वर्तुळे तूप लावल्याने खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला मदत होते.

चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी तूप खूप महत्त्वाची भूमिका निभावते.

रात्री तूप लावण्याची योग्य पद्धत

रात्री तूप लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. चेहरा सुकला की, एक चमचा शुद्ध देशी तूप घ्या आणि बोटांनी हलक्या हातांनी चेहऱ्यावर मालिश करा. अशा प्रकारे मालिश करा की तूप त्वचेत पूर्णपणे शोषले जाईल. आपण चेहऱ्याला लावलेले तूप रात्रभरही तसेच ठेवू शकतो. सकाळी चेहरा स्वच्छ धुवावा, असे आठवड्यातून किमान ३-४ वेळा करणे हे खूप गरजेचे आहे. यामुळे त्वचा तरुण तेजस्वी दिसण्यास मदत होईल.

चेहऱ्याला तूप कोणी लावू नये?

देशी तूप सर्व प्रकारच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे, परंतु ज्यांची त्वचा खूप तेलकट आहे किंवा ज्यांना मुरुमांची समस्या आहे, त्यांनी तूप लावू नये. तूप लावल्यामुळे तेलकट चेहऱ्यावर मुरुमांची समस्या अधिक वाढण्याची धोका असतो.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Skin care: कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल की कोरफड जेल… कोणते आहे सर्वोत्तम? Skin care: कोरड्या त्वचेसाठी नारळाचे तेल की कोरफड जेल… कोणते आहे सर्वोत्तम?
पावसाळा ऋतू सुरू झाला की आपल्याला आरोग्यासोबतच त्वचेची देखील काळजी घ्यावी लागते. खासकरून तेलकट त्वचा, कोरडी त्वचा, संवेदनशील त्वचा असलेल्या...
कच्ची पपई खाल्ल्यास ‘हे’ आजार तुमच्या जवळही येणार नाहीत, या 6 प्रकारे तुमच्या आहारात करा समाविष्ट
Health Tips – वारंवार होणाऱ्या डोकेदुखीवर हा आहे परिणामकारक घरगुती औषधांचा उतारा, वाचा
Pune News – कोकणकड्यावरून उडी घेतली! दरीत आढळले दोघांचे मृतदेह, तलाठी आणि कॉलेज तरुणीचा समावेश
गाझामधील नरसंहारावर पंतप्रधान मोदींच्या मौनाने हिंदुस्थानच्या नैतिक आणि राजनैतिक पतला ठेच बसली, काँग्रेसची टीका
Health Tips- कर्करोग, मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस आहे उपयुक्त, वाचा सविस्तर
Iran-Israel War – इराणमधून 400 किलो युरेनियम गायब; अमेरिकेच्या दाव्याने जगाची चिंता वाढली