अमेरिकेत WhatsApp वापरण्यावर बंदी, मेटा कंपनीला धक्का

अमेरिकेत WhatsApp वापरण्यावर बंदी, मेटा कंपनीला धक्का

अमेरिकेच्या हाउस ऑफ रिप्रझेंटेटिव्ह्ज (कनिष्ठ सभागृह) ने सरकारी डिव्हाइसेसवर व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यावर बंदी घातली आहे. यामागे सायबर सुरक्षा आणि डेटा प्रायव्हसी संदर्भातील चिंता असल्याचे सांगितले गेले आहे. या बंदीनंतर आता अमेरिकन काँग्रेसचे कर्मचारी सरकारी मोबाईल किंवा कॉम्पुटरवर व्हॉट्सअ‍ॅप किंवा त्याचा वेब वर्जन वापरू शकणार नाहीत. त्याऐवजी त्यांना Microsoft Teams, Signal, iMessage आणि FaceTime सारख्या अ‍ॅप्स आणि सॉफ्टवेअरचा वापर करण्यास सांगितले आहे.

अमेरिकन हाउसच्या चीफ अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर (CAO) च्या अहवालानुसार, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये पारदर्शकता नाही. कंपनी युजरचा डेटा कसा स्टोअर करते आणि कसा सुरक्षित ठेवते याबाबत कंपनी माहिती देत नाही. म्हणूनच हे अ‍ॅप वापरणे धोक्याचे असल्याचे सरकारने म्हटले आहे. त्यामुळे सरकारी डिव्हाइसेसवर याच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी मशीन्सवर व्हॉट्सअ‍ॅप वापरता .येणार नाही असे CAO ईमेल करून स्पष्ट केले आहे.

असे असले तरी सामान्य नागरिक व्हॉट्सॅप वापरू शकतात. ही बंदी फक्त अमेरिकन काँग्रेसच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरच लागू आहे. आता ते सरकारी डिव्हाइसेसवर ना व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड करू शकतील, ना त्याचा वेब वर्जन उघडू शकतील.

व्हॉट्सअ‍ॅपची कंपनी मेटाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कंपनीचे माजी प्रवक्ते अँडी स्टोन यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले की, “आम्ही या निर्णयाशी सहमत नाही.” व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले जाणारे सर्व मेसेज एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड असतात, म्हणजे तिसऱ्या व्यक्तीला हे मेसेजस वाचता येत नाही, अगदी कंपनीलाही. व्हॉट्सअॅपची सुरक्षा इतर अ‍ॅप्सच्या तुलनेत अधिक मजबूत आहे आणि ते युजरच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेते असेही स्टोन यांनी सांगितले की.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;