इराण इस्रायलमध्ये शस्त्रसंधी, शेअर बाजाराने साधली ‘सुवर्ण’संधी; घोडदौडीला पुन्हा सुरुवात

इराण इस्रायलमध्ये शस्त्रसंधी, शेअर बाजाराने साधली ‘सुवर्ण’संधी; घोडदौडीला पुन्हा सुरुवात

इराण- इस्रायल युद्धामुळे जागतिक शेअर बाजारासह देशातील शेअर बाजारही दबावाखाली होते. अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रावर हल्ला केल्यानंतर सोमवारी शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती. मात्र, आता इराण-इस्रायलमध्ये शस्त्रसंधीची घोषणा झाल्याने शेअर बाजाराने त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पुन्हा घोडदौडीला सुरुवात केली आहे.

इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेले युद्ध थांबवण्यात आले आहे. दोन्ही देशांनी शस्त्रसंधीला संमती दर्शवली आहे. या संधीचा फयदा साधत शेअर बाजाराने मंगळवारी जोरदार मुसंडी घेतली आहे. बाजाराची सुरुवात होताच सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. शस्त्रसंधीच्या घोषणेमुळे कच्च्या तेलाच्या किमतीही अचानक घसरल्या आहेत. शस्त्रसंधीमुळे जागतिक स्तरावर सकारात्मक संकेत मिळत असल्याने हिंदुस्थानी शेअर बाजाराची सुरुवात मंगळवारी धमाकेदार झाली. बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांक सेन्सेक्सने 900 पेक्षा जास्त अंकांनी उसळी घेतली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (एनएसई निफ्टी) निफ्टी निर्देशांकानेही 270 पेक्षा जास्त अंकांनी वाढ नोंदवली.

मंगळवारी शेअर बाजारात जोरदार तेजीसह व्यापाराला सुरुवात झाली. सेन्सेक्स 81,896.79 च्या बंदच्या स्तरापासून 82,534.61 वर उसळी घेत उघडला. त्याआधी, सोमवारी, शेवटच्या ट्रेडिंग दिवशी सेन्सेक्स 511 अंकांनी घसरून बंद झाला. तर निफ्टी 25,179.90 वर उघडल्यानंतर 25,250.85 वर व्यवहार करताना दिसला. सोमवारी तो 24,971.85 वर बंद झाला होता. सोमवारी त्यात 140 अंकांनी घसरण झआली होती.

इराण-इस्रायलमध्ये शस्त्रसंधी झाल्यानंतर अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या शेअर बाजारांमध्ये तेजी येण्याचे संकत मिळआले होते. सोमवरी अमेरिकन शेअर बाजार ग्रीन झोनमध्ये बंद झाला. डाओ जोन्स 374.96 अंकांच्या वाढीसह बंद झाला, एस अँड पी 0.51 टक्क्यांनी वाढला आणि नॅस्डॅक 183.56 अंकांच्या वाढीसह बंद झाला. याशिवाय, मंगळवारी बहुतेक आशियाई शेअर बाजारांनीही जोरदार वाढीसह व्यवहार सुरू केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;