IND Vs ENG 1st Test – अंपायरला नडणाऱ्या ऋषभ पंतवर ICC ने घेतली अ‍ॅक्शन! खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा

IND Vs ENG 1st Test – अंपायरला नडणाऱ्या ऋषभ पंतवर ICC ने घेतली अ‍ॅक्शन! खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा

हेडिंग्ले मैदानावर पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात लढाई सुरू आहे. आज सामन्याचा शेवटचा दिवस असून कोण बाजी मारणार हे निश्चित होईल. अशातच सामन्यातील दोन्ही डावांमध्ये शतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतवर ICC ने कारवाई केली आहे.

क्षेत्ररक्षण करताना पहिल्या डावात ऋषभ पंतची चेंडूवरून पंचांशी बाचाबाची झाली होती. तसेच त्याने रागाच्या भरात चेंडू मैदानावर फेकून दिला होता. याची आयसीसीने गंभीर दखल घेतली आहे. ऋषभ पंत आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणी तो दोषी आढळला आहे. पंतने लेव्हल 1 चे उल्लंघन केलं आहे त्यामुळे आयसीसीने त्याच्या खात्यात एक डिमेरिट पॉइंट जमा केला आहे. परंतु त्याचा परिणाम पंतवर होणार नाही. कारण पहिल्यांदाच डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे. जर एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांच्या कालावधीत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट मिळाले तर त्याला काही सामने खेळण्यास बंदी घातली जाते.

पृथ्वी जाणार, यशस्वी येणार; शॉने मुंबई क्रिकेट सोडले, आता अन्य राज्यासाठी फटकेबाजी करणार

ऋषभ पंतने पहिल्या डावात फलंदाजी करताना 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 6 षटकार ठोकत 134 धावा केल्या होत्या. तसेच दुसऱ्या डावातही त्याची बॅट चांगलीच तळपली, दुसऱ्या डावात त्याने 140 चेंडूंमध्ये 15 चौकार आणि तीन षटकार मारत 118 धावा केल्या. याचसोबत दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा ऋषभ पंत जगातील दुसरा यष्टीरक्षक तर सातवा हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे. तसेच इंग्लंडमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच हिंदुस्थानी खेळाडू ठरला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत....
12 दिवसांच्या लादलेल्या युद्धाचा अंत, इराणच्या राष्ट्रपतींनी केली शस्त्रसंधीची घोषणा
Latur News – एक लाखांच्या वाळूसह तब्बल 1 कोटींहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त; 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
IND Vs ENG 1st Test – युवा ब्रिगेडचा जोश कमी पडला! लीड्स कसोटीत इंग्लंडची सरशी, टीम इंडियाचा 5 विकेटने पराभव
आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा
सेक्स रॅकेट प्रकरण : खेडशीतील गौरव लॉजवर सात दिवसात 86 जणांची हजेरी
चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पुराचे सावट