चंद्रपुरात सैराट झाले वाळू माफिया; जप्त केलेला हायवा नेला पळवून,गुन्हे दाखल

चंद्रपुरात सैराट झाले वाळू माफिया; जप्त केलेला हायवा नेला पळवून,गुन्हे दाखल

राज्यभर नुकतेच वाळू घाटांचे लिलाव झाले. राज्यभर हे घाट राजकीय आणि व्यावसायिकदृष्ट्या दबंग व्यक्तींनी संगनमताने घेतले आहेत. घाटांचे लिलाव झाले. मात्र पावसाळा लागल्याने 10 जून पासून प्रत्यक्ष उत्खनन बंद झाले आहे. मात्र, सेटिंग असल्याने वाळू माफिया सैराट झाले. अशातच जुनोना गावात थेरगाव येथील घाटावरून अवैध उत्खनन केलेले हायवा येणार असल्याची माहिती चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार यांना मिळाली होती.

आपल्या पथकासह त्यांनी हायवा पकडले. आणि हायवा चंद्रपुरात आणत असताना अचानक त्यांच्या शासकीय गाडीपुढे एक कार पार्क करत रस्ता अडविण्यात आला. काही कळायच्या आत माफियांनी हायवा डोळ्यासमोरून पळवून नेले. नंतर कार चालकही फरार झाला. तहसीलदार पवार यांनी या घटनेची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी अंकुश वर्मा, सोनूसिंग या वाळू व्यावसायिक आणि कारचालक रहमान खान याच्याविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शहर पोलीस या धक्कादायक घटनेचा तपास करत आहेत. तहसीलदार पवार यांनी या घटनेनंतरही रात्री आणखी 2 अवैध वाळू वाहने जप्त करत धडक कारवाई चालविली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;