ट्रम्प यांना न जुमानता इस्रायलने पुन्हा इराणवर केला हल्ला, डागली क्षेपणास्त्रे
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण व इस्त्रायलमध्ये युद्धबंदीची घोषणा केल्याच्या काही तासातच इस्त्रायले त्यांच्या शब्दाला न जुमानता पुन्हा एकदा हल्ल्यांना सुरुवात केली आहे. इस्त्रायलने मंगळवारी संध्याकाळी इराणवर क्षेपणास्त्र डागली. इराणची राजधानी तेहरानमध्ये दोन मोठे ब्लास्ट झाले आहेत. त्यामुळे आता युद्ध आणखी पेटण्याची शक्यता आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधीवर सहमती झाल्याची घोषणा सोमवारी केली. ‘इराण आणि इस्रायलमध्ये पूर्ण आणि अंतिम शस्त्रसंधी झाली आहे. शस्त्रसंधी सहा तासांच्या आत सुरू होईल आणि इराण प्रथम त्याचं पालन करेल. इराणनं शस्त्रसंधीचं पालन केल्यानंतर, पुढील 12 तासांनंतर इस्रायल देखील शस्त्रसंधीत सामील होईल. 24 तासांनंतर युद्ध औपचारिकपणे थांबल्याचं मानलं जाईल.’ अशीपोस्ट त्यांनी शेअर केलेली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List