इस्रायल आणि इराण दोघांनीही शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन, डोनाल्ड ट्रम्प संतापले

इस्रायल आणि इराण दोघांनीही शस्त्रसंधीचं केलं उल्लंघन, डोनाल्ड ट्रम्प संतापले

मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीचं उल्लंघन दोन्ही देशांनी केलं आहे. विशेषतः इस्रायलवर संताप व्यक्त करताना ट्रम्प म्हणाले की, “इस्रायलने युद्धविराम करार स्वीकारल्यानंतर लगेचच हल्ले केले, जे मला अजिबात आवडलं नाही.” रॉयटर्सने याबाबत वृत्त दिलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर इराण आणि इस्रायल यांच्यात पूर्ण आणि संपूर्ण शस्त्रसंधी लागू झाल्याची घोषणा केली होती. हा करार 24 तासांत टप्प्याटप्प्याने लागू होणार होता, ज्यामुळे मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित होईल, असा दावा त्यांनी केला होता. शस्त्रसंधीनुसार, इराणने प्रथम हल्ले थांबवायचे होते, त्यानंतर 12 तासांनी इस्रायलनेही हल्ले थांबवायचे होते. 24 तासांनंतर युद्ध औपचारिकपणे थांबल्याचं मानलं जाणार होतं.

मात्र या घोषणेनंतर काही तासांतच दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ले केल्याचे आरोप केले. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी इराणवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याचा आरोप करत तेहरानवर जोरदार प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, इराणनेही इस्रायलवर शस्त्रसंधीनंतर हल्ले केल्याचा दावा केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;