कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, गेल्या पाच महिन्यांत राज्यातून 17 हजारहून अधिक महिला बेपत्ता

कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, गेल्या पाच महिन्यांत राज्यातून 17 हजारहून अधिक महिला बेपत्ता

गेल्या पाच महिन्यात राज्यातून 17 हजारहून अधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत. 2025 च्या पहिल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रातून 30 हजारहून अधिक लोक बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती राज्य पोलिसांच्या ‘मिसिंग पर्सन्स डेटाबेस’वरून समोर आली आहे. याचा अर्थ दररोज सुमारे 200 लोक राज्यातून बेपत्ता होत आहेत. राज्यात सर्वाधित बेपत्ता होण्याचे प्रमाण हे मुंबईत आहे. जानेवारी ते मे या काळात एकूण 3 हजार 473 लोक बेपत्ता झाले असून जे राज्याच्या एकूण संख्येच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त अआहे.

टाईम्स ऑुफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. मुंबईची नंतर सर्वाधिक ठाण्याचून लोक बेपत्ता झाले आहे. ठाण्यात गेल्या पाच महिन्यात 2 हजार 3 लोक बेपत्ता झाले आहेत. मुंबईपेक्षा लहान असूनही ठाणे हे राज्यातील सर्वात दाट लोकसंख्या असलेले शहर आहे आणि तेथील बेपत्ता व्यक्तींची संख्या सातत्याने वाढत आहे. या यादीत एक धक्कादायक नाव म्हणजे अहिल्यानगर. अहिल्यानगरमध्ये 1 हजार 411 लोक बेपत्ता झाले आहेत. पुण्यातून 1 हजार364 लोक बेपत्ता झाले, तर नाशिक ग्रामीणमधून 1 हजार 338 प्रकरणे नोंदवली गेली.

या एकूण आकड्यांमध्ये 18 वर्षांवरील प्रौढांचा समावेश आहे त्यात 12,467 पुरुष आणि 17,646 महिला आहेत. म्हणजेच एकूण 30,113 लोक बेपत्ता झाले आहेत. नागपूर शहरात 1,069 बेपत्ता प्रकरणे नोंदवली गेली आहेत नागपूर ग्रामीण भागातून 581 प्रकरणे आली आहेत, तर नागपूर रेल्वे विभागातून 15 प्रकरणे नोंदवली गेली.

महिन्यांनुसार ही आकडेवारी पाहिल्यास जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान बेपत्ता होणाऱ्यांच्या संख्येत सुमारे 3 टक्क्यांनी घट झाली होती. मात्र, मार्चमध्ये ही संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. फेब्रुवारीत 2,197 पुरुष बेपत्ता झाले होते, तर मार्चमध्ये 2,576 झाले. महिलांमध्ये ही संख्या 3,027 वरून 3,546 वर गेली म्हणजे 17 टक्क्यांनी वाढ झाली होती. काही लोक घरगुती वादामुळे घर सोडून गेले असतात, काही मानसिक आजारांनी ग्रस्त असतात, काहींचं अपहरण झालेलं असतं किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे हरवलेले असतात आणि त्यांचे मृतदेहही सापडलेले नसतात. बेपत्ता होण्यामागे अशी कारणं समोर आली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;