जून महिन्यातच रानसई धरण ओव्हर फ्लो, उरणकरांची पाण्याची चिंता मिटली

जून महिन्यातच रानसई धरण ओव्हर फ्लो, उरणकरांची पाण्याची चिंता मिटली

उरण तालुक्यातील अडीच लाख नागरिकांना पाणी पुरवठा करणारे रानसई धरण जुनमध्येच मंगळवारी सकाळी सुमारास ओव्हर फ्लो होऊन वाहु लागले आहे. मागील काही दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहु लागले आहे. मागील वर्षीही 18 जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उप अभियंता ग्यानदेव सोनावणे यांनी दिली.

उरण तालुक्यातील रानसई धरण 1971 साली बांधण्यात आले आहे. रानसई धरणाची उंची 116 फूट 6 इंच असुन त्याची साठवण क्षमता 10 दशलक्ष घनमीटर आहे. उरण परिसरातील 25 ग्रामपंचायती, उरण शहर आणि काही औद्योगिक विभागासह सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाल्याने आठवड्यातील दोन दिवस पाणी कपातही जाहीर करण्यात आली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;