चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची धो धो धम्मालऽऽऽ, संडे असो वा मंडे आमचा रोजच फन डे

चिरनेरच्या आक्कादेवी बंधाऱ्यावर पर्यटकांची धो धो धम्मालऽऽऽ, संडे असो वा मंडे आमचा रोजच फन डे

ऐतिहासिक चिरनेर गावातील आक्कादेवी बंधारा सध्या पर्यटकांना साद घालत आहे. हिरवीगार झाडी.. कधी रिमझिम तर कधी कोसळणारा धो धो पाऊस अशा वातावरणात संडे असो की मंडे पर्यटकांची येथे गर्दी होत आहे. आपल्या कुटुंबकबिल्यासह अनेक पर्यटक येथील धबधब्यावर येऊन धो धो धम्माल करीत आहेत.

चिरनेर येथे नव्याने आक्कादेवी बंधारा हे पर्यटनस्थळ म्हणून उदयास आले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत हा धरणवजा बंधारा असून तो पावसाळ्यात दुथडी भरून वाहतो. या भागात असलेल्या डोंगरातील निसर्ग नेहमी सर्वांनाच साद घालतो. पावसाळ्यात तर हा बंधारा व परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलून निघते. मात्र पर्यटकांनी मौजमस्ती करण्यासाठी येताना आपल्या सुरक्षेचीदेखील काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पर्यटक इथे का येतात?
आक्कादेवीच्या डोंगरात पावसाळ्यातच बिबट्या, भेकर, हरीण, रानडुक्कर, वानर, मोर आदी पक्षी-प्राणीही जंगलात स्वैरपणे विहार करताना हमखास दृष्टीत पडतात.

चिरनेर गावाजवळच हे धरण असल्याने या ठिकाणी पर्यटकांना खाद्यपदार्थदेखील सहज उपलब्ध होत आहे. शिवाय वाहने पार्किंगसाठी जागा आहे.

पावसाळ्यातच दिसणाऱ्या हिरव्यागार निसर्गाचा आणि वर्षा सहलीचा आनंद लुटण्यासाठी दरवर्षी पर्यटकांची पावले आपसूकच नकळतपणे आक्कादेवी डोंगराकडे वळतात.

हुतात्मा स्मारक, स्तंभ आणि पेशवेकालीन गणपती मंदिर
आक्कादेवी धबधब्यावर केवळ रायगड जिल्ह्यातीलच नव्हे तर ठाणे, मुंबई, नवी मुंबई भागातूनही मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. शनिवार, रविवार दोन दिवसांची सुट्टी एन्जॉय करीत असतानाच चिरनेरमधील ऐतिहासिक वास्तूही पर्यटकांना बघता येतात. 1930 साली झालेला जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे. या सत्याग्रहाच्या स्मृती हुतात्मा स्तंभ व स्मारकाच्या रूपाने जिवंत आहेत. हे स्मारक तसेच पेशवेकालीन गणपतीचे मंदिर पाहण्यासाठीदेखील पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. चिरनेरमधील पर्यटनस्थळांमध्ये आता आक्कादेवी धबधब्याची भर पडल्याने स्थानिकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;