न्यूझीलँडमध्ये आदिवासींकडून हिंदुस्थानविरोधात निदर्शने; ध्वजाचा अवमान, अराजक पसरण्याची शक्यता

न्यूझीलँडमध्ये आदिवासींकडून हिंदुस्थानविरोधात निदर्शने; ध्वजाचा अवमान, अराजक पसरण्याची शक्यता

न्यूझीलँडमध्ये किवी आणि माओरी आदिवासी जमातींनी द्वेषाचे तीव्र प्रदर्शन करत हिंदूंचे झेंडे जाळल्याने अराजकता पसरली आहे. द्वेषाच्या वाढत्या लाटेने अराजकतेचे संकट निर्माण होण्याची भीती आहे. आदिवासी जमातींनी आता वाढत्या हिंदू लोकसंख्येविरुद्ध युद्ध पुकारल्याचे चित्र दिसत आहे.

कंटेंटिस्ट धार्मिक नेते ब्रायन तामाकी यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. न्यूझीलँडच्या ऑकलंडमधील निदर्शकांनी गैर-ख्रिश्चन धर्मांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ध्वजांचा अवमान केला. हिंदू, इस्लामिक, पॅलेस्टिनी, बौद्ध आणि शीख प्रतीकांचा समावेश असलेले ध्वज फाडत पायदळी तुडवण्यात आले. या कृतीनंतर निषेध दर्शवणारे हाका नृत्य करण्यात आले. यावेळी स्थलांतरित समुदायांनाही लक्ष्य केले. एकात्मीकरणाशिवाय स्थलांतर नाही असे धोरण राबवण्याचे आवाहन केले.

डेस्टिनी चर्चचे नेते ब्रायन तामाकी यांनी त्यांच्या अनुयायांसह मध्य ऑकलंडमध्ये मोर्चा काढला. त्यावेळी त्यांनी दावा केला की न्यूझीलंडमध्ये ख्रिश्चन नसलेल्या धर्मांचा प्रसार आता नियंत्रणाबाहेर गेला आहे. निषेधादरम्यान, सहभागींनी हिंदू, बौद्ध, शीख आणि इस्लामिक समुदायांसह धार्मिक ध्वज फाडले आणि पायदळी तुडवले. श्रद्धा, ध्वज आणि कुटुंब या घोषणेखाली काढण्यात आलेला हा मोर्चा डेस्टिनी चर्चने स्थलांतर आणि ख्रिश्चन नसलेल्या धर्मांविरुद्ध आयोजित केला होता. तामाकी म्हणाले की, चर्चच्या नेत्यांनी पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांना एक खुले पत्र पाठवले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, देशाला कोणताही अधिकृत धर्म नाही ही भूमिका बदलावी.

आपण धोकादायक काळात जगत आहोत. हे आपल्या ध्वजासाठी उभे राहण्याची वेळ आली आहे. जगभरातील मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतराने ख्रिश्चन देशांना उद्ध्वस्त केले जात आहे. शीखांनी आपला देश, आपले व्यवसाय आणि आपल्या कंपन्या ताब्यात घेतल्या. तसेच आता ते किवींना काम देत नाहीत, तर ते त्यांच्या स्वतःच्या लोकांना कामावर ठेवतात,असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;