Health Tips- कर्करोग, मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस आहे उपयुक्त, वाचा सविस्तर

Health Tips- कर्करोग, मधुमेह आणि वजन कमी करण्यासाठी हा ज्यूस आहे उपयुक्त, वाचा सविस्तर

शरीर म्हटल्यावर व्याधी या होणार आहेतच. परंतु या व्याधी होण्याआधीच आपण काही काळजी घेतली तर अधिक उत्तम. आपल्या स्वयंपाकघरातील अनेक फळे भाज्या या आपल्या शरीरासाठी पौष्टिक मूल्ये म्हणून गरजेच्या आहेतच. परंतु याच गोष्टी आपल्यासाठी आजारपणातही आणि त्या आधीची काळजी म्हणूनही गरजेच्या आहेत. अशीच एक फळभाजी म्हणजे टोमॅटो. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी, ऑरगॅनिक सोडियम, फॉस्फरस, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सल्फरचा चांगला स्रोत आहे. टोमॅटो त्वचेसाठी तसेच आपल्या केसांसाठी सुद्धा फायदेशीर आहे. इतकेच नाही तर, बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर टोमॅटो यामध्ये देखील उपयुक्त आहे.

टोमॅटोच्या ज्सूसचे फायदे

टोमॅटोचा ज्यूस आपल्या त्वचेसाठी अतिशय उपयुक्त मानला जातो. यामुळे अकाली येणारे वृद्धत्व कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे आपल्या त्वचेला अनोखा तजेलाही प्राप्त होतो.

टोमॅटोच्या ज्यूसमध्ये तसेच टोमॅटोमध्ये कर्करोगविरोधी गुणधर्म असतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की टोमॅटोच्या रसात महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. टोमॅटोमध्ये ‘लाइकोपीन’ हा घटक असतो. हे एक विशेष अँटिऑक्सिडंट आहे, जे अल्फा कॅरोटीन, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ई पेक्षा जास्त शक्तिशाली मानले जाते. ते कर्करोग रोखण्यास मदत करते.

तुम्हालाही भूक लागत नाही का! घरातील ही वस्तू तुमची भूक वाढवेल, वाचा

टोमॅटोमध्ये कॅलरीज हा खूप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी टोमॅटो ज्यूस हा फार महत्त्वाची भूमिका बजावतो. एका लहान टोमॅटोमध्ये सुमारे 16 कॅलरीज असतात. कमी कॅलरीज आणि जास्त पोषक तत्वे हवी असतील तर, आहारात टोमॅटोचा ज्यूस समाविष्ट करायला हवा.

टोमॅटोमध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम हाडांच्या ऊतींच्या दुरुस्तीस मदत करतात. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते. ते हाडे मजबूत करण्यास मदत करते. टोमॅटोचा रस प्यायल्याने शरीरातील लायकोपीनची कमतरता दूर होते, ज्यामुळे हाडांवर ताण कमी होतो.

आम्लता आणि गॅसपासून मुक्ती मिळवायची असेल तर तुमच्या आहारात टोमॅटो किंवा त्याचा रस समाविष्ट करा. टोमॅटोमध्ये भरपूर कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन सी असते. ते पोटातील वायू आणि आम्लता दूर करण्यास मदत करते. त्यात असलेले क्लोरीन आणि सल्फर पोटातील वायूची तक्रार दूर ठेवतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा आंबा पिकवायचा? ‘या’ उपायांनी केमिकलशिवाय घरीच पिकवा
उन्हाळा आला की प्रत्येकालाच ज्या फळाची सर्वात जास्त उत्सुकता असते ते म्हणजे आंबा! पण बाजारातून घेतलेले अनेक आंबे कॅल्शियम कार्बाइड...
सेक्स रॅकेट प्रकरण : खेडशीतील गौरव लॉजवर सात दिवसात 86 जणांची हजेरी
चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पुराचे सावट
IND Vs ENG 1st Test – इंग्लंडच्या सलामीवीरांनी केली ऐतिहासिक भागी, लीड्समध्ये 76 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत
टोकन दर्शनाचे बोगस पास बनवून रांगेत प्रवेश करणाऱ्या 6 भाविकांवर कारवाई
Ratnagiri News – नुकसान भरपाई द्या, जीवन संपवण्याची वेळ आणू नका; आंबा बागायतदारांचा सरकारला इशारा
शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादानाला मंत्रिमंडळाची मंजुरी, दोन मंत्र्यांचा विरोध; सतेज पाटील यांचा तीव्र आंदोलनाचा इशारा