इराण-इस्रायल युद्धाचे गडद ढग ओसरले, सोन्याचे दर घसरले; जाणून घ्या आजचे दर…

इराण-इस्रायल युद्धाचे गडद ढग ओसरले, सोन्याचे दर घसरले; जाणून घ्या आजचे दर…

इराण-इस्रायल युद्धाचा जगावर परिणाम झाला होता. तसेच जगातील अनेक शेअर बाजार दबावाखाली व्यवहार करत होते. त्यातच सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुतंवणूकदार सोन्या-चांदीत गुंतवणूक करत होते. मात्र, आता दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली असून युद्धाचे गडद ढग ओसरल्याने सोन्यातील गुंतवणूक आणि सोन्याची मागणी कमी झाल्याने सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. एका दिवसात सोन्याचे दर तब्बल दोन हजार रुपयांनी घसरले आहेत.

सराफा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या किमतीत घट झाली आहे. आता 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 97288 रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, चांदीच्या किमतीतही घट दिसून आली आहे. 22 कॅरेटचे सोने आता 89116 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. सोमवारी याचा दर 91001 रुपये होता. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता 97288रुपये आहे, सोमवारी याचे दर 99348 रुपये होता. तर 995 शुद्धतेचे सोने 96898 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, याचे दर सोमवारी 98950 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

916 शुद्धतेसह 22 कॅरेट सोने आता 89116 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोमवारी याचे दर 91001 रुपये होते. 750 शुद्धतेच्या 18 कॅरेट सोन्याची किंमत आता 72966 रुपये आहे. तर 585 शुद्धतेच्या 14 कॅरेट सोन्याची किंमत आता 56913 रुपये आहे. सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आता चांदीचा दर 107063 रुपये प्रति किलो आहे. सोमवारी हा दर 105898 रुपये होता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;