समुद्रात नौदलाची ताकद वाढणार, 1 जुलैला युद्धनौका आयएनएस ‘तमाल’ नौदलात दाखल होणार

समुद्रात नौदलाची ताकद वाढणार, 1 जुलैला युद्धनौका आयएनएस ‘तमाल’ नौदलात दाखल होणार

हिंदुस्थानी नौदलाची ताकद आता आणखी वाढणार आहे. 1 जुलै 2025 ला रशियातील कलिनिनग्राद येथील यंतर शिपयार्डमध्ये बनवलेली नवीन स्टील्थ मल्टी रोल फ्रिगेट युद्धनौका तमाल अधिकृतपणे हिंदुस्थानी नौदलात दाखल होणार आहे. या युद्धनौकेला हिंदुस्थान आणि रशियाने संयुक्तपणे तयार केले आहे. या ऐतिहासिक समारंभात भारतीय नौदलाचे वेस्टर्न नौदल कमांडचे प्रमुख व्हाइस अॅडमिरल संजय जे. सिंह प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तमाल ही युद्धनौका भारत-रशिया संरक्षण संबंध यासोबतच आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत भारतीय युद्ध क्षमतेच्या नव्या उंचीवर पोहोचणारी खास युद्धनौका बनेल. तमाल युद्धनौकेला रशियाच्या यंतर शिपयार्डमध्ये बनवण्यात आले आहे. या युद्धनौकेला भारताने विदेशी स्रोतने खरेदी केले आहे. आता यानंतर सर्व युद्धनौका मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत भारतात तयार केल्या जातील. तमाल मध्ये 26 टक्के स्वदेशी टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. यात ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ मिसाईलचा महत्त्वपूर्ण आहे. या युद्धनौकेत अत्याधुनिक सेंट्रिक वॉरफेयर टेक्नोलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट लावले आहेत. यात एयर अर्ली वार्ंनग आणि मल्टी रोल हेलिकॉप्टर ऑपरेशनची सुविधा देण्यात आली आहे. ही युद्धनौका तीन महिन्यांपासून समुद्रातील चाचणीत यशस्वी झाली आहे. तमालवर 250 सदस्यांनी समुद्री प्रशिक्षण घेतले आहे. तुशील क्लासअंतर्गत आणखी दोन युद्धनौका गोवा शिपयार्डमध्ये बनवल्या जात आहेत. याला त्रिपुट क्लास म्हटले जाते. याची डिझाईन रशियाच्या सेवर्नोए डिझाईन ब्युरोच्या सहकार्याने केली आहे.

शत्रूंना धडकी भरणार

तमालला लांब पल्ल्यासाठी बनवण्यात आले आहे. याशिवाय यात व्हर्टिकल लाँच सरफेस टू एअर मिसाईल, आधुनिक 100 मिमी गन, ईओ, आयआर सिस्टम, सीआयडब्ल्यूएस, हेविवेट टोरपीडो, अँटी सबमरीन रॉकेट्स आणि उच्च फायर कंट्रोल व सर्विलान्स रडार लावले आहेत. याची डिझाईन खूपच स्टेल्थ आहे. यामुळे या युद्धनौकेला रडारवर पकडणे मुश्कील आहे. यामुळे समुद्रातील शेजारी राष्ट्रांच्या शत्रूंना धडकी भरणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;