‘नागास्त्र’ शत्रूचा कर्दनकाळ; शत्रूचा अचूक वेध, पहिली खेप लष्कराच्या भात्यात

‘नागास्त्र’ शत्रूचा कर्दनकाळ; शत्रूचा अचूक वेध, पहिली खेप लष्कराच्या भात्यात

हिंदुस्थानी लष्कराच्या भात्यात ‘नागास्त्र 1 आर’ हे स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन समाविष्ट झाले आहे. ‘नागास्त्र 1 आर’ची पहिली खेप लष्कराला मिळाली. नागपूरच्या सोलार डिफेन्स अँड एअरोस्पेस लिमिटेडने हे अस्त्र बनवले आहे. लष्कराची वाढती गरज लक्षात घेऊन ‘नागास्त्र 1 आर’ची निर्मिती केली आहे. लष्कराने एकूण 450 ‘नागास्त्र 1 आर’ची मागणी केली आहे. केवळ शत्रूवर नजर ठेवणारे नाही, तर शत्रूला शोधून हवेतच उद्ध्वस्त करणारे हे अस्त्र आहे.

‘नागास्त्र 1 आर’ हे आत्मघाती ड्रोन पूर्णपणे स्वदेशात बनवलेले आहे. त्यामध्ये 80 टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर केला आहे. त्यामध्ये अनेक सेन्सर लागलेले आहेत. या अस्त्राचा वापर रात्रीही करता येईल.

  • लक्ष्याभोवती घिरटय़ा घालत शत्रूचा वेध घेणारी हवाई अस्त्र प्रणाली. हे आत्मघाती अस्त्र आहे. शत्रूच्या प्रांतात लक्ष्याच्या वरून हवेत फिरत राहते आणि योग्य संधी मिळताच अचूक निशाणा लावून शत्रूला संपवतो. ‘नागास्त्र 1 आर’चे वैशिष्टय़ म्हणजे हल्ला रद्द झाला तर त्याला परत मागे बोलावू शकतो. त्याचा नंतर वापर करू शकतो.
  • जीपीएस आधारित अचूक हल्ला – ‘नागास्त्र 1 आर’ जीपीएसवर आधारित आहे. त्यामुळे शत्रूवर अचूक हल्ला करता येतो. आत्मघाती मोडवर गेल्यावर तर तो शत्रूच्या ठिकाणांवर भयंकर हल्ले करू शकतो.
  • ‘नागास्त्र 1 आर’ ड्रोन शत्रूच्या रडार यंत्रणेलाही चकवा देऊ शकतो. 4500 मीटरपेक्षा जास्त उंचीवर उडू शकतो. शत्रूच्या छावणीपर्यंत गुपचूप पोहोचायचे आणि तिथूनच हल्ले करायचे ही त्याची खासियत आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करायला याचा वापर चांगला होईल.
  • रेंज आणि संचलन क्षमता अधिक चांगली आहे. त्याची फिक्स्ड विंग इलेक्ट्रिक यूव्हीची मेन इन लूप रेंज 15 किलोमीटर आहे. ऑटोनोमस मोडमध्ये 30 किलोमीटरपर्यंत ऑपरेट होऊ शकते. याची हवेत राहण्याची क्षमता 60 मिनिटे आहे. म्हणजे तासभर तरी शत्रूच्या भागात घिरटय़ा घालू शकतो.
  • विदेशी अस्त्रांवर एकदम भारी
  • विदेशी अस्त्रांच्या तुलनेत अधिक स्वस्त, जास्त विश्वासदर्शक आणि पुन्हा वापरता येईल, असा आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;