Monsoon Snacks – घाईच्या वेळी करा झटपट होणारे चविष्ट, कुरकुरीत पोह्यांचे पकोडे! चहासोबत किंवा इतर वेळी खाण्यासाठी सर्वात बेस्ट

Monsoon Snacks – घाईच्या वेळी करा झटपट होणारे चविष्ट, कुरकुरीत पोह्यांचे पकोडे! चहासोबत किंवा इतर वेळी खाण्यासाठी सर्वात बेस्ट

आपल्याकडे पोहे म्हटल्यावर केवळ आपल्या नजरेसमोर कांदेपोहे, बटाटेपोहे असे पोह्याचे विविध पदार्थ येतात. परंतु पोह्यांपासून केवळ कांदेपोहेच नाही तर, इतर अनेक पदार्थ करता येतात. त्यातील एक महत्त्वाचा टेस्टी पदार्थ म्हणजे पोह्याचे पकोडे. पोह्याचे पकोडे म्हणजेच पोह्यांपासून तयार केलेली कुरकुरीत भजी.

क्रिस्पी पोहे पकोडे हा पदार्थ चहासोबत एक उत्तम नाश्ता आहे. घरी नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी वेगळे आणि कुरकुरीत खावेसे वाटेल. तेव्हा हे पकोडे नक्की करुन बघा.

विशेष म्हणजे या रेसिपीमध्ये फार वेळ जात नाही. त्यामुळेच हे पोह्यांचे पकोडे अगदी लगेच होतात. हे पकोडे बाहेरून कुरकुरीत असल्यामुळे, बच्चेकंपनीसाठी सुद्धा हा एक मस्त नाश्त्याचा पर्याय आहे.

पोहे पकोडे रेसिपी

साहित्य

1 कप पोहे (जाड किंवा मध्यम)
1 उकडलेला बटाटा (मॅश केलेला)
1 कांदा (बारीक चिरलेला)
2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेला)
1 टीस्पून आले (किसलेले)
2 टेबलस्पून कोथिंबीर (बारीक चिरलेली)
1/4 टीस्पून हळद
1/2 टीस्पून लाल मिरची पावडर
1/2 टीस्पून गरम मसाला
1 टीस्पून लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर
चवीनुसार मीठ
2 टेबलस्पून बेसन
1 टेबलस्पून तांदळाचे पीठ (पर्यायी – कुरकुरीतपणासाठी)
तळण्यासाठी तेल

 

Monsoon Street Food- घरी केलेली खेकडा भजी कुरकुरीत होत नाही, मग या टिप्स फाॅलो करा!

कृती

सर्वात आधी पोहे धुवून चाळणीमध्ये भिजण्यासाठी ठेवून द्यावे. किमान 5-7 मिनिटे भिजू द्यावे. म्हणजे पोह्यांना थोडा मऊपणा येईल.

भिजवलेले पोहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये घ्या. त्यात मॅश केलेले बटाटे, कांदे, हिरव्या मिरच्या, आले आणि कोथिंबीर घालावी. आता त्यात हळद, मिरची पावडर, गरम मसाला, मीठ आणि लिंबाचा रस घाला. शेवटी बेसन आणि तांदळाचे पीठ घाला आणि सर्वकाही चांगले मिसळा. मिश्रण हाताने थोडे दाबून मिक्स करा जेणेकरून ते पकोड्यासाठी तयार होईल.

पॅनमध्ये तेल गरम करा. आता तयार केलेल्या मिश्रणाने हाताने भजीच्या आकाराचे गोळे करा, आणि गरम तेलात घाला. पकोडे मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. लक्षात ठेवा की एकाच वेळी खूप पकोडे घालू नका.

तळलेले पकोडे टिश्यू पेपरवर काढून टाका जेणेकरून अतिरिक्त तेल निघून जाईल. नंतर ते गरम चहा आणि चटणीसोबत सर्व्ह करा.

हे पोह्याचे पकोडे कोथिंबीर-पुदिन्याची चटणी, गोड चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉससोबत सर्व्ह करू शकता. जर तुम्ही वरून थोडासा चाट मसाला देखील टाकू शकता, यामुळे याची चव अधिक वाढेल.

काही खास टिप्स

कांद्याऐवजी, तुम्ही बारीक चिरलेले गाजर, बीन्स किंवा स्वीट कॉर्न देखील घालू शकता.

तुम्हाला हे पकोडे अधिक पौष्टीक बनवायचे असतील तर, एअर फ्रायरमध्ये तेल न घालता कुरकुरीत बनवू शकता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;