Homemade Facial – पार्लरमध्ये न जाताच आता तुम्हाला मिळेल फेशियल केल्याचं समाधान, या घरगुती उपायांनी तुमचा चेहरा चमकेल
सौंदर्य खुलवण्यासाठी स्त्रिया अनेकदा पार्लरमध्ये जाऊन नानाविध ट्रिटमेंट घेत असतात. परंतु पार्लरमध्ये न जाताच, आता घरच्या घरी फेशियल केल्याचे समाधान मिळणार आहे. काही साधे सोपे उपाय आपल्या चेहऱ्याला एक नवा तजेला लूक देऊ शकतात. साधे सोपे उपाय केल्याने, आपल्या खर्चावरही नियंत्रण राहते. शिवाय आपल्याला रिझल्टही चांगला मिळतो. आंघोळीपूर्वी एक छोटासा घरगुती उपाय तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक आणि थंडावा देऊ शकतो. नारळाचे तेल आंघोळीपूर्वी हे तेल चेहऱ्यावर लावल्याने आश्चर्यकारक फायदे होतात. नारळाच्या तेलाची खास गोष्ट म्हणजे ते थंडगार आहे, म्हणून त्वचेसाठी हे तेल वरदानापेक्षा कमी नाही. खोबरेल तेलात तुरटी मिसळून चेहऱ्यावर लावल्याने काय होते हे तुम्हाला माहिती आहे का?
नारळ तेल आणि गुलाबजल या दोघांचे मिश्रण म्हणजे त्वचेची परिपूर्ण काळजी. 2 चमचे नारळाच्या तेलात काही थेंब गुलाबजल मिसळा आणि ते चेहऱ्यावर लावा आणि 20-25 मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. गुलाबपाणी त्वचेला टोन देते, तिचा पीएच संतुलित करण्यास मदत करते आणि नारळ तेल त्वचेला खोलवर मॉइश्चरायझ करते. हे मिश्रण त्वचेला मऊपणा आणि थंडपणा दोन्ही देते.
त्वचेसाठी कूलिंग ट्रीटमेंटची आवश्यकता असेल, तर तुम्ही आंघोळीपूर्वी चेहऱ्यावर मुलतानी माती आणि खोबरेल तेल लावू शकता. 2 चमचे मुलतानी माती नारळाच्या तेलात मिसळा आणि गुळगुळीत पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि पूर्णपणे सुकल्यावर धुवा. मुलतानी माती त्वचेवरील धूळ, घाण आणि तेल काढून टाकते, तर नारळाचे तेल त्वचेला थंड करते आणि पोषण देते.
एक चमचा शुद्ध खोबरेल तेल घ्या आणि ते चेहऱ्यावर 2-3 मिनिटे गोलाकार हलक्या हाताने मसाज करा. 30 मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा.
नारळ तेल आणि बेसन हे दोन्ही देसी ग्लो मिळवण्याचा मार्ग आहे. 2 चमचे बेसनामध्ये समान प्रमाणात नारळाचे तेल मिसळा आणि ते पेस्टसारखे चेहऱ्यावर लावावे. हे मिश्रण 30 मिनिटे तसेच राहू द्यावे. त्यानंतर सुकल्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवावा.
नारळ तेल आणि चंदन पावडर आंघोळीपूर्वी हे दोन्ही लावल्याने त्वचेला ताजेपणा आणि स्पष्टता येते. 2 चमचे चंदन पावडरमध्ये नारळाचे तेल मिसळून गुळगुळीत पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावून, 25-30 मिनिटे तशीच राहू द्या. यानंतर चेहरा धुवावा. चंदन त्वचेला थंडावा देते, लालसरपणा, मुरुम आणि जळजळ कमी करते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List