Iran-Israel War – इराणमधून 400 किलो युरेनियम गायब; अमेरिकेच्या दाव्याने जगाची चिंता वाढली

Iran-Israel War – इराणमधून 400 किलो युरेनियम गायब; अमेरिकेच्या दाव्याने जगाची चिंता वाढली

इराण आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी झाल्याने जगावरील महायुद्धाचे सावट दूर झाले आहे. मात्र, अमेरिकेने केलेल्या एका दाव्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. या युद्धाच्या कालावधीत इराणमधून 400 किलो युरेनियम गायब झाले आहे. एवढ्या युरोनियमद्वारे सुमारे 10 अणुबॉम्ब बनवण्यात येऊ शकतात. अमेरिकेच्या या द्वायमुळे जगाला नवा धोका निर्माण झाला आहे.

इराणमधून गायब झालेला 400 किलो युरेनियमचा साठा 10 अणुबॉम्ब बनवण्यासाठी पुरेसा आहे, असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी सांगितले आहे. अमेरिकेने इराणच्या तीन अण्वस्त्र केंद्रावर बंकर बस्टरने हल्ला चढवल्यानंतर 400 किलो युरेनियम गायब झाल्याचे सांगण्यात आले. गायब झालेले युरेनियम 60 टक्क्यांपर्यंत समृद्ध केले होते. तर अण्वस्त्र बनवण्यासाठी युरेनियम 90 टक्क्यांपर्यंत समृद्ध करणे आवश्यक असते. त्यामुळए गायब झालेले युरेनियम जगासाठी मोठा धोका ठरू शकते.

हल्ल्याच्या काही दिवस आधी इराणने हा साठा आणि महत्त्वाची उपकरणे गुप्त ठिकाणी स्थलांतरीत केली असतील, असा दावा इस्रायली अधिकाऱ्यांनी केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यापूर्वीच्या उपग्रह प्रतिमांमध्ये फोर्डो अणुऊर्जा प्रकल्पाबाहेर 16 ट्रकची रांग दिसून आली. मात्र, हल्ल्यानंतरच्या प्रतिमांमध्ये तिन्ही ठिकाणी लक्षणीय नुकसान दिसून आले परंतु ट्रक गायब झाले होते. त्यातूनच युरेनियम गुप्त ठिकाणी नेण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ते कुठे हलवण्यात आले हे स्पष्ट नसले तरी अमेरिका आणि इस्रायलचा ठाम विश्वास आहे की ते इस्फहानजवळील दुसऱ्या भूमिगत साठवण सुविधेत हलवण्यात आले असतील. त्यामुळे आता शस्त्रसंधी झाली असली तरी गायब झालेल्या युरेनियममुळे जगाचा धोका वाढला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;