ट्रम्प यांच्या युद्धविराम घोषणेला इराणकडून केराची टोपली? काही तासांतच इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, इस्रायलमध्ये तिघांचा मृत्यू

ट्रम्प यांच्या युद्धविराम घोषणेला इराणकडून केराची टोपली? काही तासांतच इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, इस्रायलमध्ये तिघांचा मृत्यू

इस्रायलमधील बे’एर शेवा (Be’er Sheva) या दक्षिणेकडील शहरात मंगळवारी सकाळी इराणकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात किमान तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धविराम होणार असल्याची घोषणा केवळ काही तासांपूर्वीच केली होती.

हल्ल्यानंतर समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये संबंधित निवासी इमारत पूर्णतः उद्ध्वस्त झालेली दिसत आहे. परिसरातील वाहने आणि झाडेही स्फोटानंतरच्या आगीत भस्मसात झाल्टाचे त्यात स्पष्टपणे दिसून येते.

इस्रायली लष्कराने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, काही वेळापूर्वी इराणकडून देशावर क्षेपणास्त्र डागण्यात आले असून, त्यांचा शोध घेण्याचे व त्यांना अडविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास (जागतिक वेळेनुसार 02:00 GMT), देशाच्या विविध भागात सायरन वाजवण्यात आला होता.

Iran Israel Ceasefire : 12 दिवसांनंतर युद्ध थांबलं, इराण आणि इस्रायलमध्ये शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी दिलेल्या निवेदनात सांगितले होते की, दोन्ही देशांमध्ये टप्प्याटप्प्याने युद्धविराम लागू केला जाणार असून, प्रथम इराण आपल्या सैनिकी कारवाया थांबवेल. हा युद्धविराम सकाळी 4 वाजता GMT नुसार लागू होणार होता, मात्र त्याआधीच इराणकडून हा हल्ला झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

तेहरानमधील एविन तुरुंग, सरकारी इमारतींवर इस्रायलचे हल्ले

Iran Missile Strike Kills 3 in Israel’s Be’er Sheva Hours After Trump Announces Ceasefire

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;