एअर इंडियाच्या विमानात पाच प्रवासी, दोन केबिन क्रू बेशुद्ध

एअर इंडियाच्या विमानात पाच प्रवासी, दोन केबिन क्रू बेशुद्ध

लंडनहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विमानातील पाच प्रवासी आणि दोन केबिन क्रू अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने बेशुद्ध पडले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. विमानाचे मुंबईत सुरक्षित लँडिंग केल्यानंतर तत्काळ प्रवाशी आणि केबिन व्रूंची वैद्यकीय तपासणी करून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने निवेदनाद्वारे दिली आहे.

बिघाडाची मालिका सुरूच

एअर इंडिया, इंडिगोसह विविध विमान कंपन्यांच्या विमानांमध्ये तांत्रिक बिघाड होण्याची मालिका अद्याप सुरूच आहे. त्यामुळे अनेक विमान उड्डाणे रद्द करावी लागत असल्याचे चित्र आहे. आज एअर इंडिया एक्स्प्रेसची दोन विमाने आणि इंडिगोच्या एका विमानाचे उड्डाण रद्द करावे लागले. जयपूर-दुबई विमानाच्या कॉकपिटमध्ये तांत्रिक बिघाड आढळल्यामुळे 130 प्रवाशांना घेऊन जाणारे उड्डाण रद्द करावे लागले, तर श्रीनगरला जाणारे विमान लँडिंग न होताच नवी दिल्लीला परतले.

z इंदूरमधून भुवनेश्वरला निघालेले इंडिगोचे विमान इच्छित स्थळी पोहोचलेच नाही. इंडिगोचे फ्लाइट 6ई6332 हे विमान तांत्रिक बिघाडामुळे मधूनच परत आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;